महिलांनी कार्यातूून महावितरणचा नावलौकिक वाढवावा - मुख्य अभियंता अनिल डोये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 06:26 PM2019-03-09T18:26:38+5:302019-03-09T18:27:05+5:30
अकोला : महिला आपल्या कर्तुत्वामुळे आज सर्वच क्षेत्रात कार्यरत असून ,महावितरणमध्ये सुद्धा वरिष्ठ व्यवस्थापनापासून ते तंत्रज्ञ स्तरावर सेवा बजावीत असून त्यांनी आपल्या कार्य व कौशल्यातून महावितरणचा नावलौकिक आणखी वाढवावा, असे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले.
अकोला : महिला आपल्या कर्तुत्वामुळे आज सर्वच क्षेत्रात कार्यरत असून ,महावितरणमध्ये सुद्धा वरिष्ठ व्यवस्थापनापासून ते तंत्रज्ञ स्तरावर सेवा बजावीत असून त्यांनी आपल्या कार्य व कौशल्यातून महावितरणचा नावलौकिक आणखी वाढवावा, असे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले. ते शुक्रवारी विद्युत भवन येथील सभागृहात आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या विद्युत भवनातील सभागृहामध्ये आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अतिरिक्त कार्यकारी अभियंता कविता देशभ्रतार प्रमुख उपस्थिती अधीक्षक अभियंते पवनकुमार कछोट व राहुल बोरीकर, मार्गदर्शक डॉ ममता इंगोले, डॉ सीमा बक्षी व योगिता कछोट उपस्थित होत्या. महावितरणमध्ये अभियंते, अधिकारी कर्मचारी, तंत्रज्ञ या पदावर कार्यरत महिला भरीव कामगिरी करीत असून कायार्सोबतच त्यांनी आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन सुद्धा मुख्य अभियंता यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महिला दिनाविषयक गीत राजेश्वरी जोशी व रोहिणी पाटील यांनी गायीले. यावेळी डॉ.ममता इंगोले, डॉ. सीमा बक्षी, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, व्यवस्थापक शिवाजी तिकांडे तथा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वंदना बाबर, सूत्रसंचालन शुभांगी साबळे व सुजाता खराळकर तर आभार जोत्सना मांडले यांनी केले. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंते प्रशांत दाणी, गजेंद्र गाडेकर, राजीव रामटेके प्रभारी सहायक महाव्यवस्थापक सुमित बोधी, उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, व उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, यांचेसह बहुसंख्य महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या.