बोरगाव मंजू येथे महिलांनी फोडलं दारूचं दुकान

By Admin | Published: June 17, 2017 11:31 AM2017-06-17T11:31:41+5:302017-06-17T11:31:41+5:30

बोरगाव मंजूमध्ये महिलांनी दारूचं दुकान फोडल्याची घटना घडली आहे.

The women smoked shop at Borga Manju Manju | बोरगाव मंजू येथे महिलांनी फोडलं दारूचं दुकान

बोरगाव मंजू येथे महिलांनी फोडलं दारूचं दुकान

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 17- बोरगाव मंजूमध्ये महिलांनी दारूचं दुकान फोडल्याची घटना घडली आहे. कोर्टाच्या आदेशाने महामार्गावरील बंद झालेल्या दारूच्या दुकानाला गावात स्थानांतरीत करायला प्रशासनाने परवानगी दिली आहे. भरवस्तीत होत असलेल्या या दारूच्या दुकानविरूद्ध महिलांनी एल्गार पुकारला आहे. 17 जून रोजी सकाळी गावातील महिलांनी रास्ता रोको करत आंदोलन केलं. इतकंच नाही, तर संतप्त महिलांली दारूचं दुकानही फोडलं. 
 
१ एप्रिलपासून शहरातील देशी दारूची दुकानं, वाइनशॉप, बिअर शॉपी ही दारूची दुकानं न्यायालयाच्या आदेशाने बंद केली. पण सदर दुकान हे नव्याने स्थानांतरित करू नये, अशी मागणी गावातील महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा पोलीस अधीक्षक, ठाणेदार बोरगाव मंजू यांना निवेदन देऊन केली होती. मात्र या निवेदनाची प्रशासनाने कुठलीही दखल न घेता या दारूच्या दुकालाना रामजीनगर, सिद्धार्थ नगर वॉर्ड क्र. ६ च्या भरवस्तीला लागून परवानगी दिली. त्यामुळे येथील महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सामान्य माणसाचे जनजीवन धोक्यात आले आहे. या देशी दारूच्या दुकानात दारुडे परिसरात धिंगाणा घालून महिलांचा अपमान करणे, अश्लील शिवीगाळ करणं या कारणामुळे परिसरात दशहत निर्माण झाली होती त्यामुळे महिलांनी पुढाकार घेत आंदोलन केले
 

Web Title: The women smoked shop at Borga Manju Manju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.