महिला काँग्रेसचे थाली बजाओ आंदोलन

By admin | Published: January 10, 2017 02:21 AM2017-01-10T02:21:18+5:302017-01-10T02:21:18+5:30

अकोला जिल्हा महिला काँग्रेसने थाली बजाओ आंदोलन केले.

Women's Congress plate banjo movement | महिला काँग्रेसचे थाली बजाओ आंदोलन

महिला काँग्रेसचे थाली बजाओ आंदोलन

Next

अकोला, दि. ९- हजार-पाचशे रुपयांच्या नोटाबंदी आणि सहारा - बिरला कंपन्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होत असलेल्या भ्रष्टाचाराची नि:पक्ष चौकशी करावी. या मागणीसाठी सोमवारी दुपारी अकोला बसस्थानकासमोरच्या धिंग्रा चौकात अकोला जिल्हा महिला काँग्रेसने थाली बजाओ आंदोलन केले. नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी पथनाट्यही करण्यात आले. महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष साधना गावंडे यांच्या नेतृत्वात छेडण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारीदेखील मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर असलेले आरोप आणि त्याबाबतच्या पुराव्याच्या छायांकित प्रति निवेदनाद्वारे दिल्या गेल्यात. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांच्या विरुद्ध केलेल्या आरोपात तथ्य असून नि:पक्ष चौकशी करण्यासाठी देशभरात आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. सोमवारी दुपारी छेडण्यात आलेल्या थाळी बजाओ आंदोलनात कंचन गावंडे, संजीवनी बिहाडे, उषा विरक, सुषमा निचळ, स्वाती देशमुख, अर्चना राऊत, कशीश खान, जयश्री भुईभार, सीमा ठाकरे, डॉ.तब्बूसुम खान, विजया राजपूत, नंदा मानकर, प्रतिभा नागलकर, पुष्पा देशमुख, सुमन भालदाने, विरांगणा भाकरे, हिरा गावंडे, रजिया पटेल, पल्लवी देशमुख, आशा म्हैसने, सुशीला गुघे, इंदुमती पैठनकर या महिलांसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, महेश गणगणे, राजेश भारती, आकाश कावडे, अनंत बगाडे, अविनाश देशमुख, तश्‍वर पटेल आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते.

Web Title: Women's Congress plate banjo movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.