महिला दिवस : भाजपा तर्फे वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:11 PM2018-03-08T15:11:54+5:302018-03-08T15:11:54+5:30
अकोला : पुरुष आणि महिला मानवता कार्याचे दोन पंख असून मातृशक्तीला सबलीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सरकार कटीबद्ध असून, राजस्थान येथील शक्ती पीठ झुजुनू येथून देशभरातील महिलांच्या कल्याणासाठी सरकार ने योजना सुरू केल्या असून मातृशक्ती चा सन्मान ही संस्कृती असल्याचे प्रतिपादन किशोर मांगटे पाटील यांनी केले
स्थानिक धिंग्रा चौक येथे भाजपा महानगर व भाजपा महिला आघाडी तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदा ताई शर्मा या होत्या . तर प्रमुख अतिथी म्हणून सुमनताई गावंडे वाहतूक शाखा नियंत्रण ठाणेदार विलास पाटील, गीतांजली शेगोकार, पवन पाडिया अनुप गोसावी प्रामुख्याने उपस्थित होते.
जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून भाजपा तर्फे वाहतूक नियंत्रण शाखेतील कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा पूजा दांडगे आणि अश्विनी माने यांचा सत्कार करून, त्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी वाटर बॅग खासदार संजय धोत्रे ,आमदार गोवर्धन शर्मा ,आमदार रणधीर सावरकर ,यांच्या नेतृत्वात प्रधान करण्यात आले . तसेच विविध क्षेत्रातील मातृशक्ती चा सन्मान करण्यात आला. यावेळी योगिता पावसाळे , सारिका जैस्वाल, रश्मी अवचार, अर्चना म्हसने, निशा कळी, साधना येवले, आरती घोगलिया, अर्चना चौधरी ,,रंजना विंचनकार , हरी भाऊ काळे, अजय शर्मा , सुनील क्षीरसागर, अमोल गोगे, जयश्री दुबे , विजय परमार, अनिल मुरूमकर, आकाश ठाकरे ,अभिजित बांगर , विजय इंगळे, सागर शेगोकार, हरीश काळे, जयंत मसने, डॉ. गौरव शर्मा ,रुपेश जैस्वाल ,निलेश निनोरे, उखंदराव सोनोने , वर्षा गावंडे , रेखा नालट आदी यावेळी उपस्थित होते .