उमेद अभियानातर्फे महिला दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:19 AM2021-03-10T04:19:37+5:302021-03-10T04:19:37+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती पातूर येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट कार्य करणारी महिला, बँक ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती पातूर येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट कार्य करणारी महिला, बँक सखी समुदाय संसाधन व्यक्ती लक्षी धाये, आयसीआरपी वैशाली निलखन यांचा सत्कार करण्यात आला. विदर्भ कोकण ग्रामीण बँक आलेगाव येथील शाखाधिकारी तक्षक ओलंबे यांचा सत्कार गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला. विदर्भ कोकण ग्रामीण बँक पातूर येथील शाखाधिकारी राजेंद्र दुबे यांचा सत्कार सभापती लक्ष्मी डाखोरे यांनी केला. विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांनी मंजूर केलेल्या कर्जाचे वितरित करण्यात आले.
तसेच स्वामी समर्थ स्वयंम सहायता समूह याला फिरता निधी वाटप करण्यात आला.
अस्मिता योजना अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन स्टॉलचे शुभारंभ करण्यात आले.
पातूर तालुक्यातील महा आवास योजने अंतर्गत बाभूळगाव आणि शिर्ला ग्रामपंचायतमध्ये घरकूल कार्य शुभारंभ आणि गृहप्रवेश कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाला पं. स. सदस्य अर्चना डाबेराव, सुनीता टप्पे, राज विलास बागडे, माधव नखाते, रिजवान शेख, रामभाऊ डुकरे, मजलस अस्वले, सहायक प्रशासक प्रवीण जाधव, शिपाई पंकज वाकोडे उपस्थित होते. संचालन आयसीआरपी देशना उपरवट यांनी केले. आभार शाहरुख शेख यांनी केले.
फोटो: