भोपळे विद्यालयात महिला शिक्षण दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:16 AM2021-01-04T04:16:41+5:302021-01-04T04:16:41+5:30
हिवरखेड : येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी ...
हिवरखेड : येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे होते. यावेळी आदर्श शिक्षक दे. ना. महाजन, संस्थेचे सहकार्यवाह श्यामशील भोपळे, संचालक शिवशंकर मार्के, तेल्हारा पंचायत समितीच्या उपसभापती प्रतिभा इंगळे, सुनंदा भोपळे, संवादचे सतीश इंगळे, संस्थेच्या संचालिका साधना भोपळे, संचालक स्नेहल भोपळे, जया भोपळे, सरिता पंकज राठी, नवनियुक्त प्राचार्या रंजना अंजनकर, पर्यवेक्षिका रजनी वालोकार उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मनोगतातून प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी यथोचित भाषणे दिली. विद्यार्थ्यांच्या भाषणाचे परीक्षण करून त्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्व. श्रीमती लक्ष्मीबाई नारायणराव महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श शिक्षक दे. ना. महाजन यांच्याकडून गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम कु. आचल नागेश भुडके, व्दितीय गौरी अनंत शेटे व तृतीय प्राची अशोक बोडखे यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन पद्मा वडतकर व आभार प्रदर्शन छाया गिरी यांनी केले. यावेळी सहदेवराव भोपळे विद्यालयाचे प्रशांत भोपळे, अभिजित भोपळे, गणेश खानझोडे, स्वप्नील गिऱ्हे, सुनील वाकोडे, निखिल भड, दुर्गा बोपले, रुपाली भड, गणेश भोपळे, मयूर लहाने, गजानन पवार, अंबादास चाफे, नीलेश दांडगे, संतोष राऊत, रतनबाई ताराचंद कानुंगा, वरिष्ठ प्राथमिक शाळेचे उमेश नागपुरे, जगत व्यवहारे, गणेश सूरजुसे, गजानन देशमुख, रवींद्र सोळंके, सीमा बांगर, योगेंद्र राऊत यांची उपस्थिती होती.