जय बजरंग विद्यालयात महिला शिक्षण दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:16 AM2021-01-04T04:16:52+5:302021-01-04T04:16:52+5:30
कुंभारी: येथील जय बजरंग विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. कोरोनाच्या नियमाचे ...
कुंभारी: येथील जय बजरंग विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. कोरोनाच्या नियमाचे पालन करून ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मीना आमले हाेत्या. यावेळी प्राचार्य विलास इंगळे, पर्यवेक्षक संतोष गावंडे, ज्येष्ठ शिक्षक सुनील फोकमारे, प्रा. श्रीराम पालकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा ताडे यांनी केले. प्रास्ताविक संध्या ताडे यांनी केले. आभार शारदा उमाळे यांनी तर कार्यक्रमाचे तंत्र संयोजन क्रीडा शिक्षक बी. एस. तायडे यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणी येथील शिक्षक अजय पाटील, सीताराम दुपारे यांनी कार्यक्रमाला भेट दिली. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी ऑनलाइन उपक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर भाषणे तथा गीताद्वारे प्रकाश टाकला. यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतून आरुषी तायडे हिने ‘मी लेक सावित्रीची, मी लेक सावित्रीची, घेऊनिया पोट हाती, जगू पाखराच्यासाठी, मी लेक सावित्रीची असा संदेश देऊन उपस्थितांचे मने जिंकली. अंजली थोरात, प्राची तायडे, तनिशा तायडे, शीतल घोरपडे, ऋषिकेश पांडे, विश्वराज भातकुले, कुणाल वानखडे, शुभम दामोदर, सत्यजित शित्रे, पंकज उमाळे, मनीषा तायडे, यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला धनंजय पुसेगावकर, बजरंग गावंडे, विजय शिंगाडे, प्रा. शारदा बावणेर, प्रा. अपर्णा खुमकर व इतर शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.