असंघटित क्षेत्रातील महिलांचे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:18 AM2021-03-08T04:18:15+5:302021-03-08T04:18:15+5:30

नाेंदणीसाठी मजुरांना हेलपाटे अकाेला: नाेंदणीकृत मजुरांना ऑनलाइन नाेंदणीच्या नूतनीकरणासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ऑनलाईन अर्जामधील अनेक त्रुटी ...

Women's movement in the unorganized sector | असंघटित क्षेत्रातील महिलांचे आंदाेलन

असंघटित क्षेत्रातील महिलांचे आंदाेलन

Next

नाेंदणीसाठी मजुरांना हेलपाटे

अकाेला: नाेंदणीकृत मजुरांना ऑनलाइन नाेंदणीच्या नूतनीकरणासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ऑनलाईन अर्जामधील अनेक त्रुटी दूर करण्यासाठी मजुरीचा एक दिवस वाया घालवावा लागताे त्यामुळे ऑफलाइन नाेंदणी करावी अशी मागणी सत्यदेव तायडे यांनी केली आहे

महिला दिनाच्या निमित्ताने चर्चासत्र

अकाेला: संत रविदासीय महिला मंडळाच्या वतीने संत रविदास जयंती तसेच महिला दिनाचे औचित्य साधून स्वबंधनातून मुक्ततेकडे या चर्चासत्राचे आयाेजन करण्यात आले आहे. साेमवारी हाेणाऱ्या या चर्चासत्रात अनिता दायकर, डाॅ. कांचन शेगाेकार, डाॅ. शाेभा यशवंते, डाॅ. चित्रा मालखे आदी सहभागी हाेणार आहेत.

घरकूल लाभार्थ्यांना वाळू मिळेना

अकाेला: बाेरगाव मंजूर परिसरातील घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने घरकुलांचे काम रखडले आहे. शासनाने वाळू घाटांचा लिलाव न केल्यामुळे सध्या अवैध वाळूची माेठी विक्री हाेत आहे; मात्र हा भाव घरकूल लाभार्थ्यांना परवडत नाही.

काेविड सेंटरमधील लूट थांबवा

अकाेला: खासगी काेविड सेंटरमध्ये रुग्णांची प्रचंड आर्थिक लूट हाेत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. त्याची दखल घेण्यात यावी अशी मागणी छावा संघटनेचे अध्यक्ष शंकरराव वाकाेडे, प्रदीप खाडे, मनाेहर पाटील, अशू वानखडे, अरविंद कपले, राजेश वाकाेडे आदींनी केली आहे

गर्भाशय तपासणी शिबिर

अकाेला: भारतीय प्रसूती व स्त्रीराेग संघटनेच्या वतीने शुक्रवारी गर्भाशय तपासणीच्या माेफत शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी डाॅ. किरण गुप्ता, डाॅ. दीपिका संघवी, डाॅ. कांचन भुईभार, डाॅ. वर्षा घाटे, डाॅ. शिल्पा चिरानिया आदी उपस्थित हाेते.

Web Title: Women's movement in the unorganized sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.