स्त्रीविषयक धोरणे, कायद्यांची अंमलबजाणी गरजेची - डॉ. माहसा माश्फदेयान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2022 12:37 PM2022-03-20T12:37:07+5:302022-03-20T13:00:29+5:30
Dr. Mahsa Moshfegyan : ‘सामाजिक न्याय व सामुदायिक सद्भाव’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्र गुरुवारी पार पडले.
अकोला : वैश्विक स्तरावर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीविषयक धोरणे आणि कायदे यांची सक्त अंमलबजावणी झाली पाहिजे, असे प्रतिपादन इराक देशातील सलाहद्दीन विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. माहसा माश्फदेयान यांनी येथे केले. स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या समाजशास्त्र व अंतर्गत गुणवत्ता कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ‘सामाजिक न्याय व सामुदायिक सद्भाव’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्र गुरुवारी पार पडले. या चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. माहसा माॅश्फदेयान बोलत होत्या.
चर्चासत्राचे उद्घाटन नवी दिल्ली येथील भारतीय समाजशास्त्र सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. आभा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोपाल खंडेलवाल होते. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, पं.दे.कृ. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य डॉ. नीलिमा सरप उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जगदीश साबू यांनी केले. यावेळी संशोधकांचे शोधनिबंध असलेल्या आधार जर्नलचा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. संचालन प्रा. डिंपल मापारी यांनी केले. आभार प्रा. डॉ. नीलिमा सरप यांनी मानले.
चर्चासत्राचा समारोप शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. ताराताई हातवळणे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ए. बी. मसांडा, प्रा. हेमंत राजोपाध्ये, प्राचार्य डॉ. जगदीश साबू, समन्वयक डॉ. नीलिमा सरप उपस्थित होत्या. यावेळी प्रा. विरोचन रावोटे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. आदिती मानकर यांनी केले. आभार प्रा. डिंपल मापारी यांनी मानले. प्रा. डॉ. रोहन शिरसाट, प्रा. डॉ. नितीन सुरडकर, प्रा. डॉ. शेखर दीक्षित, विराज भगत, गणेश उपाध्याय यांनी साहाय्य केले.
दोन सत्रात पार पडला कार्यक्रम
पहिल्या सत्राचे अध्यक्ष कोल्हापूर विद्यापीठचे प्रा. डॉ. जगन कराळे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे विद्यापीठाचे डॉ. संजीव सोनवणे उपस्थित होते. प्रा. विरोचन रावते, प्रा. लालजीराम मीना यांनी शोधनिबंधाचे वाचन केले. संचालन प्रा. डॉ. जयश्री सकळकळे यांनी केले. आभार प्रा. दिप्ती पेठकर यांनी मानले.
दुसऱ्या सत्राच्या अध्यक्ष अमरावती येथील भारती महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. दया पांडे होत्या. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. श्रुती तांबे उपस्थित होत्या. प्रा. स्वाती पिंगळे, स्नेहा झुंझुटे, प्रा. निरांजना गेडाम यांनी शोधनिबंधाचे वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. संध्या काळे यांनी केले. आभार प्रा. डॉ. मिलिंद शिरभाते यांनी मानले.