वटपौर्णिमेनिमित्त महिला संघाने केले वृक्षारोपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:57+5:302021-06-25T04:14:57+5:30

वडाच्या रोपट्याच्या रोपणासह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वट पौर्णिमेला वडाच्या वृक्षाला महत्त्व असते. वडाच्या वृक्षाचे वैज्ञानिक फायदे आहेत. ...

Women's team planted trees on the occasion of Vatpoornime! | वटपौर्णिमेनिमित्त महिला संघाने केले वृक्षारोपण!

वटपौर्णिमेनिमित्त महिला संघाने केले वृक्षारोपण!

Next

वडाच्या रोपट्याच्या रोपणासह विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वट पौर्णिमेला वडाच्या वृक्षाला महत्त्व असते. वडाच्या वृक्षाचे वैज्ञानिक फायदे आहेत. त्यामुळे वडाच्या रोपट्यासह विविध प्रकारचे वृक्ष वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले. अन्वी मिर्जापूर, बोरगाव मंजू, वनी रंभापूर या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम सम्यक सुकेशिनी महिला संघाच्या रमा जामनिक, सविता खांडेकर, अरुणा इंगळे, लता सदांशिव, कांता वानखडे, सुनंदा तायडे, रेखा तायडे, संगीता पळसपगार, कल्पना शिराळे, नंदाबाई इंगळे, विमल गवई, विशाखा मनोरे, मीना सदांशिव, दीपा इंगळे, सुमन पांडे, यनुबाई आटोटे यांनी स्वखर्चाने वृक्षांची रोपटी उपलब्ध करून दिली. त्यांचे रोपण करून त्या रोपट्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.

फोटो:

५०१ वृक्षारोपणासह संवर्धनाचा संकल्प

वट पौर्णिमेनिमित्त ५०१ रोपट्यांचे रोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प महिला संस्थेने केला. हा उपक्रम पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सर्पमित्र कुमार सदांशिव, सर्पमित्र सुरज सदांशिव, सर्पमित्र प्रशांत नागे, योगेश तायडे, प्रफुल सदांशिव, करण पातालबंसी आदी राबविणार आहेत.

Web Title: Women's team planted trees on the occasion of Vatpoornime!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.