रस्त्याच्या कडेला पडलेली लाकडे उलचणे सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:19 AM2021-05-09T04:19:00+5:302021-05-09T04:19:00+5:30

वाडेगाव : मागील कित्येक दिवसांपासून वाडेगाव-बाळापूर-पातूर रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली मोठमोठे ...

The wood lying on the side of the road starts picking up! | रस्त्याच्या कडेला पडलेली लाकडे उलचणे सुरू!

रस्त्याच्या कडेला पडलेली लाकडे उलचणे सुरू!

Next

वाडेगाव : मागील कित्येक दिवसांपासून वाडेगाव-बाळापूर-पातूर रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली मोठमोठे झाडे तोडल्या गेली. झाडे तोडल्यानंतर लाकडांचे ओंडके रस्त्याच्या कडेलाच पडून होते. यामुळे वाहनचालक व पादचारी यांना ये-जा करताना कसरत करावी लागत होती. तसेच अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभागाला जाग आल्यानंतर रस्त्याच्या कडेला पडलेली लाकडे उचलण्याचे काम सुरू केले आहे.

पातूर-बाळापूर रस्त्याचे काम सुरू असून, यामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली होती. तसेच दोन्ही बाजू खोदून ठेवल्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने दोन्ही बाजूचे झाडे तोडण्यात आली. त्यानंतर लाकडे रस्त्याच्या कडेलाच पडून होती. वाडेगाव परिसरात तब्बल ७० ते ८० झाडे तोडण्यात आली होती. तोडल्यानंतर लाकडे गत एक ते दोन महिन्यांपासून रस्त्यावरच पडून होती. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती. ही समस्या लक्षात घेत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभागाला जाग आल्यानंतर लाकडे उचलण्याचे काम सुरू केले आहे. (फोटो)

Web Title: The wood lying on the side of the road starts picking up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.