रस्त्याच्या कडेला टाकलेले लाकूड ठरतेय धोकायदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:17 AM2021-04-15T04:17:38+5:302021-04-15T04:17:38+5:30
खेट्री : गेल्या काही दिवसापासून अकोला-वाशिम महामार्गाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. पातूर - अकोला मार्गाच्या कडेला असलेले मोठ्या ...
खेट्री : गेल्या काही दिवसापासून अकोला-वाशिम महामार्गाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. पातूर - अकोला मार्गाच्या कडेला असलेले मोठ्या झाडांची कटाई करून लाकूड रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याने किरकोळ अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला टाकलेले लाकूड धोकादायक ठरत असून, मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
अकोला - वाशिम महामार्गाचे काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. रस्त्याच्या कडेला खोदकाम केल्याने रस्ता आधीच अरुंद झाला आहे. अशातच पातूर-अकोला दरम्यान रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणारे मोठमोठे झाडांची कटाई करून कंत्राटदारांनी रस्त्याच्या कडेलाच टाकल्याने अनेक वेळा किरकोळ अपघात झाले आहे. मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. झाडांची कटाई करून लाकूड त्या ठिकाणाहून हटविणे अपेक्षित होते, परंतु कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे लाकूड तेथेच पडून आहे. याकडे संबंधितांनी दखल घेऊन रस्त्याच्या कडेला असलेले लाकूड हटविण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.