कृषी पर्यटन स्थळाचे काम थंड बस्त्यात !
By admin | Published: February 4, 2017 02:43 AM2017-02-04T02:43:52+5:302017-02-04T02:43:52+5:30
शिवणी विमान तळाच्या धावपट्टीचा विस्तार होणार असल्याने कृषी ी पर्यटन स्थळाचे काम थंड बस्त्यात पडणार आहे.
अकोला, दि. 0३- अकोलेकरांसह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला भेट देणार्या विदर्भातील शेतकर्यांसाठी कृषी पर्यटन स्थळ निर्माण करण्यात येणार होते; पण या पर्यटनस्थळाचे काम थंड बस्त्यात पडले आहे.
शिवणी विमान तळाच्या धावपट्टीचा विस्तार होणार असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अस्तित्वात असलेले कृषी पर्यटन स्थळ बंद पडले आहे; पण नव्याने कृषी पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा कृषी विद्यापीठाने प्रयत्न सुरू केला होता. या प्रयत्नाचे काय झाले, असा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे. अकोला शहरात रविवारची सुटी मजेत घालविण्यासाठी चाकरमान्यांसाठी असे कोणतेच स्थळ नाही. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या कृषी पर्यटनाची सैर केली जात होती. ते बंद पडले आहे.