पिंपळखुटा-वाहळा रोडवरील पुलाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:19 AM2021-04-09T04:19:15+5:302021-04-09T04:19:15+5:30

पुलाच्या कामाचे भुमिपूजन ९ फेब्रुवारी २०१९ रोजी तत्कालीन पालकमंत्री रणजित पाटील व माजी आमदार बळीराम शिरस्कार यांनी केले होते. ...

Work on the bridge on Pimpalkhuta-Wahla road is slow | पिंपळखुटा-वाहळा रोडवरील पुलाचे काम संथगतीने

पिंपळखुटा-वाहळा रोडवरील पुलाचे काम संथगतीने

Next

पुलाच्या कामाचे भुमिपूजन ९ फेब्रुवारी २०१९ रोजी तत्कालीन पालकमंत्री रणजित पाटील व माजी आमदार बळीराम शिरस्कार यांनी केले होते. या पुलाची लांबी १०५ मीटर आहे. त्यावेळची अंदाजित किंमत १७९-८२ लक्ष इतकी होती. त्यानंतर बराच कालावधी उलटुन गेला. परंतु या कामाला सुरवात झाली नाही. त्यानंतर मागील मार्च महिन्यात पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. पुलासाठी दोन-तीन ठिकाणी संबधित कत्रांटदाराकडुन खड्डे खोदुन ठेवले होते. त्यानंतर पुन्हा काम बंद पडले. गावकर्यामध्ये याविषयी तर्क-विर्तक लढविल्या जात आहेत.तरी पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे. अशी मागणी पिंपळखुटाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एका निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय अकोला यांच्याकडे केली आहे.

Web Title: Work on the bridge on Pimpalkhuta-Wahla road is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.