ब्राकोलीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचे कार्य कौतुकास्पद - राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:53 AM2021-02-20T04:53:06+5:302021-02-20T04:53:06+5:30
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी रामेश्वर सोनटक्के यांनी शेतात पारंपरिक पिकाला फाटा देत विदेशी ब्रोकोलीचे उत्पादन ...
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी रामेश्वर सोनटक्के यांनी शेतात पारंपरिक पिकाला फाटा देत विदेशी ब्रोकोलीचे उत्पादन घेतले. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे गोपाल राऊत यांनी केले. ते रामेश्वर सोनटक्के यांच्या शेतातील आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ब्राकोलीचे उत्पादन घेणाऱ्या सोनटक्के यांच्या शेतात जिल्हा कृषी अधिकारी मुरली इंगळे यांनी भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात कृषी अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, सरपंच मंगेश तायडे, तालुका कृषी अधिकारी अरूण मुंदडा, गटविकास अधिकारी सुकरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन धनोकार, सुनील मानकर, डॉ.शेख चाँद, मनोहर सोनटक्के, अनिल सोनटक्के, केशव सरप, रामेश्वर सोनटक्के, अक्षय जंजाळ यांची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांनी सुरण कंद, बोराळू कंद पिकाची पाहणी करून माहिती घेतली. (फोटो)