निवडणूक कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:45 PM2019-01-14T12:45:38+5:302019-01-14T12:47:04+5:30
अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी व शिक्षकांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी व शिक्षकांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडून ही माहिती घेण्यात येत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. निवडणूक कामासाठी जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत अधिकारी व कर्मचाºयांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने जिल्हा निवडणूक विभागामार्फत शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी आणि अनुदानित व विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांची माहिती घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सात तहसील कार्यालयांकडून कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाºयांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये संबंधित विभाग प्रमुखांना त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांची माहिती येत्या पाच दिवसांत संबंधित तहसील कार्यालयाकडे द्यावी लागणार आहे. प्राप्त झालेली अधिकारी व कर्मचाºयांची माहिती तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडे सादर करण्यात येणार आहे.