न्यायपालिकेचे पावित्र्य अबाधित राखण्याचे कार्य करा ! - न्यायमूर्ती भूषण गवई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 03:59 PM2019-07-14T15:59:00+5:302019-07-14T16:12:21+5:30

अकोला : न्यायपालिकेचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी न्यायाधीश आणि वकीलांनी कार्य करावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी रविवारी येथे केले.

Work to maintain the sanctity of the judiciary! - Justice Bhushan Gavai | न्यायपालिकेचे पावित्र्य अबाधित राखण्याचे कार्य करा ! - न्यायमूर्ती भूषण गवई  

न्यायपालिकेचे पावित्र्य अबाधित राखण्याचे कार्य करा ! - न्यायमूर्ती भूषण गवई  

Next
ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.महेंद्र शाह विचार पिठावर उपस्थित होते.

अकोला : न्यायपालिकेची प्रतिष्ठा (इमेज) कशी राहिल, हे ठरविण्याची जबाबदारी वकीलांवर असते, असे सांगत न्यायपालिका मंदिराचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी न्यायाधीश आणि वकीलांनी कार्य करावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी रविवारी येथे केले.
अकोल्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती आर.के.देशपांडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा अकोला जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, न्यायमूूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती जका अ.हक, न्यायमूर्ती विनय देशपांडे, न्यायमूर्ती रोहित देव, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्यासह प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यनशिवराज खोब्रागडे,अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.महेंद्र शाह विचार पिठावर उपस्थित होते.

Web Title: Work to maintain the sanctity of the judiciary! - Justice Bhushan Gavai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.