राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:14 AM2021-06-17T04:14:15+5:302021-06-17T04:14:15+5:30

निवेदनात, अकोला नाका चौकातील अतिक्रमण काढून रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याची मागणी केली होती. महामार्गात येणारी ...

Work on the national highway is incomplete, citizens suffer | राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट, नागरिक त्रस्त

राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट, नागरिक त्रस्त

Next

निवेदनात, अकोला नाका चौकातील अतिक्रमण काढून रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याची मागणी केली होती. महामार्गात येणारी मोठमोठी झाडे तोडण्यात आली; परंतु महामार्गात अडथळा ठरणारे वीज वाहक खांब तसेच उभे आहेत. हे खांब तातडीने हटविण्यात यावेत. अकोला नाका चौकात दुकानदारांनी केलेले अतिक्रमण व प्रवासी निवारा हटवून चौकाचे रुंदीकरण करावे. शेळद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बाळापूर न्यायालयापासून ते पारस फाट्यापर्यंत दोन्ही बाजूंनी लोकवस्तीमधील येणारे सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खोदण्यात याव्यात. महामार्गाला जोडणारे परिसरातील सिमेंट रस्ते डांबरीकरण करून जोडावेत, डांबरीकरण रस्त्याच्या बाजूला कच्चा मुरूम न वापरता पिवळ्या मातीचे ठिकठिकाणी ढीग लावले आहेत. ते हटविण्यात यावेत, अशी मागणी उपर्वट यांनी केली आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास ग्रामस्थ महामार्गावर आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Work on the national highway is incomplete, citizens suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.