नेहरू पार्क ते तुकाराम चौक रस्त्याचे काम महापालिकेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2016 01:57 AM2016-01-15T01:57:17+5:302016-01-15T01:57:17+5:30

नेहरू पार्क ते तुकाराम चौकपर्यंत डांबरी रस्त्यासाठी ९ कोटींची तरतूद.

The work of Nehru Park to Tukaram Chowk road is to Municipal Corporation | नेहरू पार्क ते तुकाराम चौक रस्त्याचे काम महापालिकेकडे

नेहरू पार्क ते तुकाराम चौक रस्त्याचे काम महापालिकेकडे

Next

आशीष गावंडे / अकोला: शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या २0 कोटींच्या अनुदानातून नेहरू पार्क ते तुकाराम चौकपर्यंत डांबरी रस्त्यासाठी ९ कोटींची तरतूद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाची दिरंगाई लक्षात घेता, या रस्त्याचे काम महापालिक ा प्रशासनाकडे सोपविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी घेतला असून, हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार असल्याची माहिती आहे. अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाला २0१३ मध्ये १५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. या निधीतून ११ डांबराचे, तर सात सिमेंट काँक्रीट रस्ते तयार करण्याचा निर्णय मनपाने घेतला. या दरम्यान, शहरातील उर्वरित रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे २५ कोटींचा प्रस्ताव सादर केला. यापैकी २0 कोटी मंजूर झाले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त निधीतून रस्त्यांचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, संबंधित विभागाने लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या मुख्य रस्त्यांसह प्रभागातील ठरावीक अंतर्गत रस्त्यांचा समावेश केला. नेमक्या याच कालावधीत मनपा आयुक्त अजय लहाने यांनी तब्बल सहा सिमेंट रस्त्यांच्या ह्यवर्किंग एस्टीमेटह्णमध्ये बदल केले. रस्त्यांच्या उर्वरित कामासाठी शासनाकडून निधी मिळवला आणि विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी निविदा प्रकाशित करून वर्कऑर्डरदेखील जारी केली. सुधारित निविदेमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण करून दुभाजक, त्यामध्ये पथदिवे आणि रस्त्याला अडथळा ठरणारे विद्युत पोल हटविण्याचा समावेश केला.

Web Title: The work of Nehru Park to Tukaram Chowk road is to Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.