पशुवैद्यकीय संस्थेतील अधिकाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 04:35 PM2020-11-03T16:35:02+5:302020-11-03T16:35:29+5:30
Akola News 2 नोव्हेंबर २०२० पासून काळ्या फिती लावून कामकाज करण्यास सुरुवात केली आहे.
अकोला : सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी, पदोन्नती, शैक्षणिक कार्यक्षमता निर्देशांक लागू करण्यासाठी तसेच रिक्त पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुर अंतर्गत सर्व घटक महाविद्यालयातील शिक्षकवर्गीय अधिकार्यांनी दिनांक १ ते ७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत लाक्षणिक आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून दिनांक 2 नोव्हेंबर २०२० पासून काळ्या फिती लावून कामकाज करण्यास सुरुवात केली आहे.
या आंदोलनादरम्यान शिक्षकवर्गीय अधिकारी नोव्हेंबर २०२० च्या दुसर्या आठवड्यात एक दिवसाची सामूहिक रजा व लेखणी बंद आंदोलन करणार आहेत. दरम्यान यासाठी प्रशासनाला ‘अल्टीमेटम’ देण्यात आले असून, मागणी मान्य न झाल्यास हे आंदोलनाचे टप्पे राबविले जाणार आहेत. सदर आंदोलनाची विद्यापीठ प्रशासनाने योग्य दखल घेवून शासन स्तरावर मागण्यांचा पाठपुरावा न केल्यास दिनांक ३ डिसेंबर २०२० म्हणजेच पशुवैद्यक विद्यापीठ स्थापना दिन रोजी सर्व शिक्षकवर्गीय अधिकारी तथा कर्मचारी बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात आहेत.