‘जलयुक्त शिवार’ कामांचे आराखडे रखडले!
By Admin | Published: March 8, 2016 02:21 AM2016-03-08T02:21:44+5:302016-03-08T02:21:44+5:30
अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील ५१९ गावांमध्ये कामे केव्हा सुरू होणार?
संतोष येलकर/अकोला
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये यावर्षी ५१९ गावांची निवड करण्यात आली; मात्र निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या कामांचे जिल्हास्तरीय आराखडे मंजूर करण्याची प्रक्रिया अद्याप रखडली आहे. त्यामुळे निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे केव्हा सुरू होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
राज्यात वारंवार उद्भवणार्या टंचाईच्या स्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राज्य शासनामार्फत गतवर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गतवर्षी प्रत्येक जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. त्यापैकी काही गावांमधील कामे पूर्ण होणे अद्याप बाकी आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसर्या टप्प्यात यावर्षी गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांतील ५१९ गावे आहेत. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शिवारफेरी काढून आणि ग्रामसभांची मंजुरी घेऊन जलयुक्त शिवारची कामे करावयाची आहेत. त्यानुषंगाने निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शिवारफेर्या काढण्यात आल्या; परंतु निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या जलयुक्त शिवारच्या कामांचे जिल्हा कृती आराखडे अद्याप पूर्ण करण्यात आले नाहीत. आराखडे तयार नसल्याने कामांच्या जिल्हा आराखड्यांना जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता देण्याची प्रक्रिया रखडली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलयुक्त शिवारची कामे करावयाची आहेत; मात्र कामांच्या जिल्हा आराखड्यांना मंजुरी मिळणे अद्याप बाकी असल्याच्या स्थितीत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे केव्हा सुरू होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
'शिवारफेरी' काढण्याचे काम पूर्ण!
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत यावर्षी निवड करण्यात आलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील ५१९ गावांमध्ये ग्रामस्थ-शेतकर्यांची शिवारफेरी काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. शिवारफेरीमध्ये गावातील पाण्याची गरज आणि त्यासाठी करावयाची ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे; यासंदर्भात नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात कामे सुरू होणे अद्याप बाकी आहे.
'जलयुक्त शिवार' कामांसाठी निवडलेली जिल्हानिहाय गावे
जिल्हा गावे
अकोला १२५
बुलडाणा २४0
वाशिम १५४
...................
एकूण ५१९