‘नेरधामणा’च्या पंप हाऊसचे काम ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:45 PM2018-12-01T12:45:30+5:302018-12-01T12:47:19+5:30
अकोला : खारपाणपट्ट्यातील (नेरधामणा)पूर्णा बॅरेजच्या पंप हाऊसचे काम ठप्पच आहे.या कामासाठीचे नकाशे अद्याप मिळाले नसल्याने या कामाला बराच कालावधी लागणार आहे.
अकोला : खारपाणपट्ट्यातील (नेरधामणा)पूर्णा बॅरेजच्या पंप हाऊसचे काम ठप्पच आहे.या कामासाठीचे नकाशे अद्याप मिळाले नसल्याने या कामाला बराच कालावधी लागणार आहे.
खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बॅरेजची श्रृखंला तयार करण्यात आली आहे.तथापि कामे अपूर्ण आहेत. पूर्णा-२ बॅरेजचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे तथापि पंप हाऊस, धरणाच्या वक्रव्दाराचे काम व्हायचे आहे.सिंचनाची व्यवस्था पाईप लाईन करण्याचे नियोजन आहे. त्यासाठीची अद्याप शेती उपलब्ध झाली नसून,धरणाचे काम केव्हा पूर्ण होईल,असा प्रश्न या भागातील शेतकरी,जनतेला पडला आहे.
आता रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याने कामावर परिणाम झालेला आहे. शासकीय कामासाठी रेती घाट उपलब्ध करू न देणे गरजेचे आहे.घाटाचे आरक्षण मागच्यावर्षीच करणे अपेक्षीत होते तथापि तेही झाले नसल्याचे चित्र आहे. शासनाने या सर्व कामांसाठी ८८८ कोेटी रू पये मंजूर केले आहेत.पंरतु हा सर्व निधी लालफीतशाहीत अडकल्याने कामावर परिणाम झाला आहे. रेतीचा साठा नसल्याने नदीपात्रातील सिंमेटीकरण तसेच नदी पात्रातील खोºयाच्या कामावरही परिणाम झाला आहे.