अकोला जिल्हय़ात शिधापत्रिका ‘आधार लिंक’चे काम पूर्ण होईना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 02:23 AM2018-02-16T02:23:36+5:302018-02-16T02:23:56+5:30
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हय़ात शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम गत दोन वर्षांपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, १३ फेब्रुवारीपर्यंत ७८ टक्के शिधापत्रिका ‘आधार लिंक’चे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शिधापत्रिका ‘आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क

सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य गट, अंत्योदय योजना आणि एपीएल शेतकर्यांना दरमहा रास्त भाव दुकानांमधून धान्य वितरित करण्यात येते.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत वितरित करण्यात येणार्या धान्याचा लाभ पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मिळावा आणि धान्य वितरणातील काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करून शिधापत्रिका लाभार्थींना धान्य वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक ’ करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. जिल्हय़ात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट, अंत्योदय योजना आणि एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींची संख्या ३ लाख ६७ हजार ९८७ असून, त्यापैकी १३ फेब्रुवारीपर्यंत ७८ टक्के शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
उर्वरित २२ टक्के शिधापत्रिका आधार ‘लिंक’ करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील शिधापत्रिका आधार ‘लिंक’चे काम पूर्ण केव्हा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हय़ातील शिधापत्रिका आधार ‘लिंक’चे काम ७८ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित शिधापत्रिका आधार लिंक करण्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.
- संतोष शिंदे,
जिल्हा पुरवठा अधिकारी.