लिकेज जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:13 AM2021-07-12T04:13:24+5:302021-07-12T04:13:24+5:30
मूर्तिजापूर शहरातील गोयनका नगरातील रस्त्याच्या कडेला शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली होती. या लिकेज ...
मूर्तिजापूर शहरातील गोयनका नगरातील रस्त्याच्या कडेला शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली होती. या लिकेज असलेल्या जलवाहिनीत गोयंकानगरातील सांडपाणी जाऊन दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन टाले यांनी लक्ष वेधून ‘लोकमत’च्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या बाबीचा ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केल्यानंतर आता जलवाहिनीचे लिकेज काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
----------------------------------------
जलवाहिनी लिकेज असले, तरी बाहेरचे पाणी जलवाहिनीत जात नाही. त्यावर काम करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला; पण लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. मुख्य जलवाहिनी असल्याने किमान त्या कामाला चार-पाच दिवस लागतात. कामाला सुरुवात झाली असून, दोन-चार दिवसांतच काम पूर्ण होईल.
- विजय लोहकरे, मुख्याधिकारी, नगर परिषद, मूर्तिजापूर