‘सर्जीकल कॉटन’ कारखान्यात मशिनचा पट्टा गळ्यात अडकल्याने कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 06:09 PM2019-04-09T18:09:04+5:302019-04-09T18:10:19+5:30
अकोला - महाराष्ट्र राज्य औद्योगीक वसाहत महामंडळामधील वसाहत क्रमांक ४ मध्ये असलेल्या वैष्णवी सर्जीकल कॉटन कारखान्यात काम करीत असताना मशीनचा पट्टा तुटुन गळयात अडकल्याने तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
अकोला - महाराष्ट्र राज्य औद्योगीक वसाहत महामंडळामधील वसाहत क्रमांक ४ मध्ये असलेल्या वैष्णवी सर्जीकल कॉटन कारखान्यात काम करीत असताना मशीनचा पट्टा तुटुन गळयात अडकल्याने तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. एका मशीनचा पट्टा तुटल्यानंतर तो पट्टा या योगेश भालतीलक नामक आॅपरेटरच्या गळयात अडकल्याने त्याचा गळयाची नस चिरली आणि त्याचा मृत्यू झाला.
मुळचे पैलपाडा येथील रहिवासी योगेश कैलासराव भालतीलक हे महाराष्ट्र औद्योगीक वसाहत महामंडळाच्या फेज क्रमांक ४ येथे असलेल्या तसेच शहरातील रहिवासी जगदीश गांधी यांच्या मालकीच्या वैष्णवी सर्जीकल कॉटन इंडस्ट्रीज येथे मशीन आॅपरेटर म्हणूण कामाला होते. सोमवारची सुटी झाल्यानंतर मंगळवारी ते एका मशीनवर काम करीत असतांना एका मशीनचा कटरचा पट्टा तुटला अन थेट योगेश भालतीलक या कामगाराच्या गळयाला अडकला. पट्टयाचा चिरेदार भाग गळयातील नसला लागताच योगेशच्या गळयाची नस चिरली. त्याने आरडा ओरड करताच वैष्णवी सर्जीकल कॉटन इंडस्ट्रीजमधील कामगारांनी त्यांना तातडीने एका वाहनात टाकून रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यातच योगेश भालतीलक यांचा मृत्यू झाला. त्यांनी शहरातील एका मोठया रुग्णालयात योगेशला दाखविताच डॉक्टरला त्यांना मृत घोषीत केले. त्यानंतर योगेशचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. उत्तरिय तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यांचा मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच योगेशचे कुटुंबीय व मीत्र परिवारासह पैलपाडा येथील ग्रामस्थ अकोल्यात दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी एमआयडीसी पोलिसांकडे केली आहे. मात्र उत्तरीय तपासणीनंतरच या प्रकरणाची सत्यता समोर येणार आहे.