पारस औष्णिक विद्युत केंद्रतील कामगारांना गावातच मिळणार आरोग्य सेवेचा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:22 AM2021-08-27T04:22:49+5:302021-08-27T04:22:49+5:30

कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासून अकोला येथे उपचारासाठी जावे लागत होते. परंतु, संघर्ष कंत्राटी कामगार समितीच्या पाठपुराव्यामुळे कंत्राटी कामगारांना न्याय ...

Workers of Paras Thermal Power Station will get the benefit of health service in the village itself! | पारस औष्णिक विद्युत केंद्रतील कामगारांना गावातच मिळणार आरोग्य सेवेचा लाभ!

पारस औष्णिक विद्युत केंद्रतील कामगारांना गावातच मिळणार आरोग्य सेवेचा लाभ!

googlenewsNext

कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासून अकोला येथे उपचारासाठी जावे लागत होते. परंतु, संघर्ष कंत्राटी कामगार समितीच्या पाठपुराव्यामुळे कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला असून, कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. याप्रसंगी एका कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी क्लिनिक येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीज निर्मिती केंद्राचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर दामोदर होते, तर महेंद्र चौधरी (ESIC नागपूर), मयूर मेंढेकर (कल्याण अधिकारी पारस), डॉ. चांडक, पटोले, संघर्ष कंत्राटी कामगार समितीचे अध्यक्ष सतीश तायडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला सर्व समितीचे पदाधिकारी. कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य सेवेचा लाभ सर्व कंत्राटी कामगार व त्यांच्या परिवाराला सुद्धा मिळणार आहे, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष नीतेश तायडे यांनी दिली आहे. कार्यक्रमाचे संचालन करून, आभार प्रदर्शन नीतेश तायडे यांनी मानले.

Web Title: Workers of Paras Thermal Power Station will get the benefit of health service in the village itself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.