कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापूर प्रक्षेत्रातील मजुरांना मिळाले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:24+5:302021-07-22T04:13:24+5:30
या महिला मजुरांना कामावरून कमी केल्याने हातचा रोजगार गेला व त्यांच्या कुटुंबीयांना उपासमारीला सामोरे जावे लागत होते. ही बाब ...
या महिला मजुरांना कामावरून कमी केल्याने हातचा रोजगार गेला व त्यांच्या कुटुंबीयांना उपासमारीला सामोरे जावे लागत होते. ही बाब या महिला मजुरांनी वंचित बहुजन महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा तथा मा. जि. प. सदस्या प्रतिभा अवचार यांना सांगितली व अवचार यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला मजुरांसह कृषी विद्यापीठ मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र वणी रंभापूर येथील मुख्य बीजोत्पादन अधिकारी राठोड यांची भेट घेतली. बेरोजगार झालेल्या महिलांना पुन्हा मजुरी तत्त्वावर रुजू करून घ्यावे, अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल अशी इशारा वजा विनंती केली. यावेळी मुख्य बीजोत्पादन अधिकारी डॉ. राठोड विनंती मान्य करत महिलांना पुन्हा मजुरी तत्त्वावर रूजू करून घेतले ; परंतु आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे फक्त ५ दिवस या महिलांना हाताला काम मिळेल असे डॉ. राठोड यांनी सांगितले.
यावेळी पं. स. सदस्य राजेश वावकार, कोठारीचे सरपंच महेंद्र इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे नंदकिशोर निलखन, पातूर नंदापूरचे सरपंच सचिन लाखे, तालुकाध्यक्ष संजय निलखन, वंचित बहुजन आघाडीचे सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदाशिव, कोठारीचे तंटामुक्ती अध्यक्ष देविदास इंगळे, सर्कल अध्यक्ष प्रवीण वाहूरवाघ, जवळा दोळकीचे सरपंच पती गजानन चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद वानखडे, धनंजय सरकटे, अमोल मुळे, नितीन इंगळे, विनायक शिराळे तसेच महिला मजूर कुसूम इंगळे, निर्मला शिराळे, बेबी इंगळे, संगीता इंगळे, रंजना तायडे, पद्मा इंगळे, लीला इंगळे, कशाबाई इंगळे, व्दारका इंगळे, रत्नप्रभा इंगळे, शोभा सरकटे, रत्नमाला इंगळे, ललिता डोंगरे, पुष्पा इंगळे, मनकर्णा मनवर, कमला चौरपगार, कमल सराटे कौशल्या भिल्ले, ललिता गवई, मंदा गवई, कुसुम इंगळे, ललिता वानखडे, चंद्रकला गवई व इंदू शिराळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
गुरुवारी घेणार कुलसचिव यांची भेट
यावेळी महिला मजुरांनी पुरुषांप्रमाणे आम्हालाही आठवड्यातील सातही दिवस काम द्यावे अशी मागणी केली. दोन दिवसाच्या मजुरीवर तोडगा काढण्यासाठी प्रतिभाताई अवचार, बीजोत्पादन अधिकारी डॉ. राठोड, महिला मजुरांच्या काही प्रतिनिधी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी हे कृषी विद्यापीठाचे कुलसचिव खडसे यांची गुरुवार, २२ जुलैला भेट घेणार आहेत.