World Autism Day: तुमचे मूल तर 'स्वमग्नते'चा शिकार नाही ना...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 03:56 PM2019-04-02T15:56:35+5:302019-04-02T15:56:54+5:30
अकोला: इतरांसोबत संवाद न साधता स्वत:च्याच विश्वात रमणाऱ्यांची संख्या कमी नाही; पण ही केवळ सवय नसून, आॅटीझम आजारही असू शकतो. त्यामुळे तुमच्या मुलाला तर आॅटीझम नाही ना, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मनोविकार तज्ज्ञांनी केले आहे.
अकोला: इतरांसोबत संवाद न साधता स्वत:च्याच विश्वात रमणाऱ्यांची संख्या कमी नाही; पण ही केवळ सवय नसून, आॅटीझम आजारही असू शकतो. त्यामुळे तुमच्या मुलाला तर आॅटीझम नाही ना, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मनोविकार तज्ज्ञांनी केले आहे.
आॅटीझम हा मेंदूशी निगडित आजार असून, हा आजार होण्यामागचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नाही; परंतु हा एक प्रकारचा अनुवांशिक आजार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. देशात दीड ते दोन कोटी बालकांना या आजाराने ग्रासले असून, ७० पैकी एका बालक या आजाराने त्रस्त आहे. या आजारात मुलांची बौद्धिक क्षमता सामान्य असली, तरी त्याचा एकलकोंडेपणा, स्वमग्नता, इतरांपासून दुरावा, जवळचा मित्र नसणे या गोष्टी त्याला इतरांपेक्षा वेगळ््या ठरवतात. ही लक्षणे सामान्य मुलांमध्येही आढळून येतात. म्हणूनच आपल्या पाल्याला आॅटीझम आहेच याचा संशयदेखील पालकांना येत नाही. त्यामुळे पालकांनी वेळीच सतर्कता बाळगत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काय आहेत लक्षणे
- आवडीची गोष्ट वारंवार करणे
- क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास टाळणे
- प्रयत्न करूनही अभ्यासात कमकुवत असणे
- जवळचा एकही मित्र नसणे
- स्वत:च्या विश्वात स्वमग्न राहणे
पालकांची भूमिका
ही लक्षणे बालकामध्ये आढळल्यास पालकांनी त्याची शाळेतील प्रगतीचा आढावा घ्यावा. पाल्याला प्रयत्न करूनही अभ्यासात त्याची प्रगती होत नसल्यास त्याची कारणे समजून घेणे. त्याच्या मित्रांशी संवाद साधावा. त्यानंतरही समाधान न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आॅटीझम हा अनुवांशिक आजार आहे. त्यावर ठोस उपचार नसला, तरी प्रशिक्षण हाच त्यावर प्रभावी उपचार ठरू शकतो. या माध्यमातून काही प्रमाणात अशा मुलांमध्ये बदल घडवून आणणे शक्य आहे; परंतु ही प्रक्रिया निरंतर असणे गरजेचे आहे.
- डॉ. श्रीकांत वानखडे, मानसोपचार तज्ज्ञ, प्रेरणा प्रकल्प