वंचितांच्या दिवाळीसाठी सरसावली तरुणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:21 AM2017-10-23T01:21:38+5:302017-10-23T01:23:25+5:30
अकोला : दिवाळी सण हा उत्सवाचा समजला जातो. यामध्ये अनेक गोष्टी नव्याने पहावयास मिळतात. मात्र, समाजातील अनेक घटक यापासून वंचित राहतात. या वंचितांच्या दिवाळीकरिता तरुणाई सरसावली आहे. लोकसहभागातून तब्बल ५00 जणांच्या चेहर्यावर या तरुणांनी हास्य फुलविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दिवाळी सण हा उत्सवाचा समजला जातो. यामध्ये अनेक गोष्टी नव्याने पहावयास मिळतात. मात्र, समाजातील अनेक घटक यापासून वंचित राहतात. या वंचितांच्या दिवाळीकरिता तरुणाई सरसावली आहे. लोकसहभागातून तब्बल ५00 जणांच्या चेहर्यावर या तरुणांनी हास्य फुलविले आहे.
दिवाळीमध्ये प्रत्येकांच्या घरी नावीण्यता पहावयास मिळते. नवीन पदार्थ, कपडे, फटाके या माध्यमातून आनंद द्विगुणित केला जा तो. मात्र, याच दिवाळीमध्ये समाजातील अनेक घटक वंचित राहतात. या वंचित घटकांना दिवाळीचा आंनद केव्हाच घेता येत नाही. समाजात आनंदोत्सव साजरा होत असताना त्यांच्याकडे निरागसपणे पहावे लागते; परंतु या आनंदामध्ये सहभागी होता ये त नाही. रस्त्याच्या कडेला, बसस्थानक, रेल्वेस्थानक, शासकीय रुग्णालय येथे वंचित घटक मोठय़ा प्रमाणात पहावयास मिळतात. याकरिता शिवसंघर्ष मित्र परिवाराच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. एक नव्हे तर तब्बल ५00 वंचितांच्या चेहर्यावर खुललेले हास्य या तरुणाईच्या आनंदात भर टाकणारे ठरले आहे. या वंचितांच्या चेहर्यावर उमटलेले हास्य जगावेगळे होते.
बसस्थानक, रेल्वेस्थानक, शासकीय जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय येथे या तरुणाईच्या माध्यमातून फराळ, कपडे, मिठाई, फटाक्यांचे वितरण करण्यात आले. या तरुणाईने हे सर्व लोकसहभागातून उभे केले होते.
गेले अनेक वर्ष त्यांचा हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. या उ पक्रमाकरिता अभिजित मुळे पाटील, सुरज गावंडे, निखिल ठाकूर, आनंद उजाडे, शिवाजी भोसले, आशिष गिरी, प्रतीक तोंडे, निखिल साबळे, राम चुटके, ज्ञानेश गावंडे, प्रतीक देशमुख, निशांत डोंगरे, मंगेश गावंडे, अविनाश बुटे, ऋषिकेश पटोकार, अभिजित टेकाडे, निखिल बोंद्रे, प्रसन्न कुलकर्णी, स्वरूप देशमुख, दिनेश लाड, वैभव वाघमारे, धनंजय बुलबुले, प्रतीक लढे, स्वप्निल धांडे, विक्की निखाडे, आशिष शुक्ला, कुणाल ठाकूर, सौरभ इंगळे, अक्षय चतरकर, अजित घोगरे, सुरेश ठाकूर, दीपक ठाकूर, अंकुश देशमुख, सुगध खैरे, बाळू काळे, प्रणित चौंढे, अभिजित तायडे, आदित्य भांडे, आदित्य कोकाटे, अतुल भांगे, आकाश शिंदे, राजेश राठी, शुभम गावंडे, शुभम मोरे, नंदू नागे, नितीन नागे, चेतन ठाकूर, अमय घोगरे, अभिजित ननावरे, अमोल बायस्कर, किरण गावंडे, भक्ती गावंडे, आस्था गावंडे आदींसह मित्र परिवारांनी पुढाकार घेतला.