महिलेच्या तोंडावर ‘स्प्रे’ मारून घरातील सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 02:36 PM2020-03-13T14:36:25+5:302020-03-13T14:36:40+5:30

महिला घरात पाणी आणण्यास गेली असता दोन्ही आरोपी लगेच तिच्यामागे जाऊन तोंडावर स्प्रे मारला

Wrap the gold in the house by spraying it on the woman's face | महिलेच्या तोंडावर ‘स्प्रे’ मारून घरातील सोने लंपास

महिलेच्या तोंडावर ‘स्प्रे’ मारून घरातील सोने लंपास

Next

गायगाव/उरळ: पाणी मागण्याच्या निमित्ताने एक महिला व पुरुषाने घरात प्रवेश मिळवून महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केले. तसेच घरातील ५० हजार रुपयांच्या सोन्यावर हात साफ करण्याची घटना येथे गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अत्यंत रहदारीच्या अकोला निमकर्दा रस्त्यावर गायगाव येथीलच इंगळे कुटुंबीय शंकर संस्थानच्या मागे राहतात. गुरुवारी दुपारी सारिका नागनाथ इंगळे ही महिला घरी एकटी होती. यादरम्यान पल्सर गाडीवर अंदाजे ४० वर्षे वयाच्या महिला, पुरुषाने घराजवळ थांबून पाणी मागितले. महिला घरात पाणी आणण्यास गेली असता दोन्ही आरोपी लगेच तिच्यामागे जाऊन तोंडावर स्प्रे मारला. अर्ध्या तासाने महिला शुद्धीवर आल्यावर तिला कपाट उघडे दिसून त्यामधील ५० हजार रु .किमतीची पोथ चोरून नेल्याचे लक्ष्यात आले. तिने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ गोळा झाले, तोपर्यंत ती महिला व पुरुष निघून गेले होते. दरम्यान, महिलेने वर्णन केलेला चोरटा पुरुष गत तीन दिवसांपासून गायगाव बसस्थानक व परिसरात फिरून सावज शोधत होता. अखेर त्याने संधी साधत इंगळे यांच्या घरात हात साफ केला. याप्रकरणी नागनाथ महादेव इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात महिला व पुरुष आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Wrap the gold in the house by spraying it on the woman's face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.