‘एमआरआय’च्या तुटवड्यावर उतारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:12 AM2017-09-04T02:12:58+5:302017-09-04T02:13:04+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या सवरेपचार रुग्णालयात ‘एमआरआय’ मशीन उपलब्ध नसल्यामुळे गरजू रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी आता पात्र लाभार्थींची तपासणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांमधून करून घेतली जाणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. खासगी इस्पितळांमधून एमआरआय करवून घेण्यासाठी रुग्ण हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र असला पाहिजे, शिवाय त्याला खरोखरच ‘एमआरआय’ करणे गरजेचे असले पाहिजे, अशी अट घालण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

येथील सवरेपचार रुग्णालयात जिल्हाभरातून व लगतच्या जिल्हय़ांमधूनही मोठय़ा संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. येथे जवळपास सर्वच अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. सिटी स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी अशा सुविधा उपलब्ध असल्या, तरी एवढय़ा मोठय़ा रुग्णालयात ‘एमआरआय’ मशीन मात्र उपलब्ध नाही. दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सवरेपचारमध्ये लवकरच एमआरआय मशीन येणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टकडून निधीही मंजूर झाला होता; परंतु अद्यापपर्यंत येथे एमआरआय मशीन आली नाही. त्यामुळे येथे येणार्या गरजू रुग्णांना नाइलाजाने खासगी रुग्णालयांमध्ये रक्कम मोजून एमआरआय स्कॅन करवून घ्यावे लागते. गरीब घरातील रुग्णांना एमआरआयचा खर्च परवडणारा नसल्यामुळे अनेकदा त्यांच्या आजाराचे निदान होत नाही. यासाठी आता एमआरआय स्कॅन करवून घेण्याची गरज असलेल्या पात्र लाभार्थींना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी इस्पितळांमध्ये ‘रेफर’ करून तेथे मोफत एमआरआय स्कॅन करवून घेतल्या जाईल, असे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी शनिवारी आमदार बच्चू कडू यांच्याशी चर्चा करताना स्पष्ट केले.
हा लाभ घेण्यासाठी रुग्ण हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र असणे गरजेचे आहे.
सवरेपचारमध्ये एमआरआय मशीन उपलब्ध होईपर्यंत येथे येणार्या पात्र लाभार्थींना आम्ही एमआरआय स्कॅनसाठी खासगी रुग्णालयांमध्ये ‘रेफर’ करू. यासाठी त्यांना म. फुले जनआरोग्य योजनेचा लाभ दिला जाईल.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, वैद्यकीय अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.
-