चेहरा साधर्म्यामुळे पकडला चुकीचा युवक

By admin | Published: April 19, 2017 01:31 AM2017-04-19T01:31:19+5:302017-04-19T01:31:19+5:30

अकोला : चिमुकलीवर बलात्कार प्रकरणात पोलिसांनी चेहरा साधर्म्यामुळे प्रवीण चव्हाण याला अटक केली होती; मात्र प्रवीण आरोपीच नसल्याचा खुलासा पोलीस अधीक्षक यांनी केला.

Wrong young man caught by face-to-face | चेहरा साधर्म्यामुळे पकडला चुकीचा युवक

चेहरा साधर्म्यामुळे पकडला चुकीचा युवक

Next

टिळक रोड चिमुकलीवरील बलात्कार प्रकरण

अकोला : जुने शहरातील रहिवासी चिमुकलीवर बलात्कार प्रकरणात पोलिसांनी चेहरा साधर्म्यामुळे प्रवीण चव्हाण याला अटक केली होती; मात्र प्रवीण चव्हाण या प्रकरणात आरोपीच नसल्याचा खुलासा खुद्द पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकारपरिषदेत केला.
शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि प्रवीण चव्हाण या दोघांचे चेहरे ९० टक्के सारखेच असून, त्यांचे केस आणि शरीराची ठेवणही सारखी आहे, त्यामुळे ही गफलत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रवीण चव्हाण हा या प्रकरणात आरोपी नसल्याने त्याला लवकरच आरोपमुक्त करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले; मात्र या प्रकरणामुळे चव्हाण याची बदनामी झाली.
हा प्रकार चुकीतून घडल्याचे पोलीसांनी सांगितले. शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि प्रवीण चव्हाण या दोघांचे चेहरे सारखेच, त्यामुळे पीडित मुलीसमोर ओळखपरेड झाली असता, तिनेही प्रवीण आरोपी असल्याचे सांगितले होते आणि पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता प्रवीण पोलिसांना पाहताच पळून गेला होता.
पोलिसांनी आरोपींचे स्केच बनविल्यानंतर प्रवीण आणि शेख मुत्सेद्दीन यांचे चेहरे सारखेच दिसत होते, त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
प्रवीण हा २२ पर्यंत पोलीस कोठडीत असून, त्यानंतरच त्याची सुटका होणार आहे आणि दोषारोपपत्र सादर करताना त्याला आरोपमुक्त करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलीस अधिक्षकांनी स्पष्ट केले.

तपास शहर पोलीस उपअधीक्षकांकडे
दरम्यान, या बलात्कार प्रकरणाचा तपास शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा सखोल तपास आता उमेश माने पाटील करणार असून, त्यांनी मंगळवारीच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल
शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी या दोन आरोपींविरुद्ध बलात्कार, पॉस्को आणि विविध कलमासह अ‍ॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंदा साखरे याच्याविरुद्धही या कलमात वाढ करण्यात आली.

Web Title: Wrong young man caught by face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.