यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाची धग तिसऱ्या दिवशीही कायम
By atul.jaiswal | Published: December 6, 2017 02:00 PM2017-12-06T14:00:54+5:302017-12-06T14:12:44+5:30
अकोला : शेतकरी जागर मंचाने तिसऱ्या विविध मागण्यांसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात येथील पोलिस मुख्यालयात सुरु केलेल्या आंदोलनाची धग बुधवारी तिसºया दिवशीही कायमच आहे.
अकोला : शेतकरी जागर मंचाने तिसऱ्या विविध मागण्यांसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात येथील पोलिस मुख्यालयात सुरु केलेल्या आंदोलनाची धग बुधवारी तिसºया दिवशीही कायमच आहे. बुधवारी सकाळी यशवंत सिन्हा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी चर्चा केली. सरकारसोबतची चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
शेतकरी जागर मंचाने यशवंत सिन्हा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात छेडलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून शेतकी जागर मंचाचे अनेक कार्यकर्ते सोमवारपासून पोलिस मुख्यालयात ठिय्या देऊन बसले आहेत.
त्यातच अनेक राजकीय पक्षांनी सिन्हा यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा घोषित केल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढली
आंदोलनाच्या दुसºया दिवशी मंगळवारी सर्वच राजकीय पक्ष व संघटनांचा आंदोलनास पाठिंबा मिळाली. दिवसभरात भंडाºयाचे खासदार भाजप नेते नानाभाऊ पटोले व इतर नेत्यांनी आंदोलनास्थळाला भेटी देऊन समर्थन व्यक्त केले. रात्री आमदार बच्चू कडू देखील या आंदोलनात सहभागी झाले. हे सर्व नेते व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी रात्रभर पोलिस मुख्यालयात ठाण मांडून बसले.
दरम्यान, बुधवारी सकाळी यशवंत सिन्हा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुरध्वनीवरून चर्चा केली. नाफेडद्वारे शेतमा खरेदी करण्याच्या मुद्यावर बोलणी अडकली असली, तरी इतर मागण्यांसंदर्भात शासन अनुकूल आहे. त्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत या आंदोलनावर तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे.