Kasodha Parishad : हे तर ठगांचे सरकार ! - यशवंत सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 07:10 PM2018-10-23T19:10:11+5:302018-10-23T19:58:27+5:30

अकोला : शेतकºयांच्या न्याय मागण्यासाठीचे लेखी आश्वसान देऊनही पूर्ण न करणाºया राज्य शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला असून, यावरू नच ...

 Yashwant Sinha's Elgar will continue the struggle for justice for the farmers | Kasodha Parishad : हे तर ठगांचे सरकार ! - यशवंत सिन्हा

Kasodha Parishad : हे तर ठगांचे सरकार ! - यशवंत सिन्हा

Next

अकोला : शेतकºयांच्या न्याय मागण्यासाठीचे लेखी आश्वसान देऊनही पूर्ण न करणाºया राज्य शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला असून, यावरू नच हे सरकार ठगांचे असल्याचे प्रतिबिंत होत असल्याचे शरसंधान साधताना माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू च ठेवणार असल्याचा इशारा मंगळवारी अकोला येथे दिला.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=352792872134938&id=207146509854277

शेतकरी जागर मंचाच्यावतीने अकोल्यात मंगळवार, २३ आॅक्टोबर रोजी दुसºया ‘कासोधा’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संबोधित करताना सिन्हा बोलत होते.परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला शेतकरी टिना देशमुख होत्या. व्यासपिठावर खासदार शत्रुघ्न सिन्हा, आप पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग, समाजवादी पक्षाचे राष्टÑीय प्रवक्ते घनश्याम तिवारी,गुजराजचे माजीमंत्री प्रविणभाई जडेजा,आपच्या प्रिति मेनन,स्वराज्य सेनेच अब्दूल फारू ख यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिन्हा पुढे बोलताना म्हणाले की, सार्वजनिक जिवनात थापडे, ठंगाशी गाठ पडेल असे वाटले नव्हते,ज्या मागण्या सहज मान्य करण्या सारख्या असताना त्या मागण्यांची पूर्तता लेखी आश्वासन देऊन करता येत नसेल तर हे सरकार शेतकºयांच्या हिताचे नाही हे समजून घेतले पाहिजे.आमचा संघर्ष हा तोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी असल्याची टिका त्यांनी सरकारवर केली. अकोल्यात उभी ठाकलेली ही ताकद आता अकोल्यापर्यंत मर्यादित नसून संपूर्ण देशात शेतकरी लढा उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी येथे केली.या लढयात आपण एकटे नाहीत तर संपूर्ण देश उभा असल्याचे व्यासपिठावरील देशातील नेत्यांच्या उपस्थितीने हे दर्शविले असल्याचा विश्वास त्यांनी शेतकºयांना दिला.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तत्पर - शत्रुघ्न सिन्हा
शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘खामोश’ या त्यांच्या विख्यात डॉयलागने भाषणाला सुरू वात करताना देशातील ५१ टक्के शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी आपण तत्पर असल्याचे अधोरेखित केले. मी या प्रातांत नवखा असलो तरी आपल्या सर्वांचे पूर्वत शेतकरीच होते.म्हणूनच मी येथे आलो आहे. या देशातील शेती समृध्द होती.पण अलिकडे शेती लयास गेली आहे. त्याला कारणीभूत येथील व्यवस्था आहे. चांगली कसदार,उपजावू जमिन या व्यवस्थेने कवडीमोल दरात धनधागंड्याच्या घशात घातली आहे.जमिनीचा पोत बिघडल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. या गर्तेतून त्यांना बाहेर काढण्याऐवजी येथील वर्तमान व्यवस्था तोडा फोडा आणि राज्य कराचे राजकारण करीत असल्याचे टिकास्त्र त्यांनी सोडले. आमचा लढा आता शेतकºयांच्या मागण्यासाठी असेल असेही त्यांनी सुचित केले. खा. सिंह यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारचे वाभाडे काढले. बेरोजगारी, शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. पदव्या घेतलेल्या विद्यार्थ्यांना हे सरकार जर भजे तळायला लावत असेल तर यापेक्षा मोठी शोकातिंका कोणती असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.नरें्रद्र मोदी हे सेल्समन असून, कर वाढवून त्यांनी सर्वांनाच वेठीस धरले आहे.

Web Title:  Yashwant Sinha's Elgar will continue the struggle for justice for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.