नाफेडच्या हरभरा खरेदीला मुदतवाढ रणजित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

By Admin | Published: May 20, 2014 11:32 PM2014-05-20T23:32:01+5:302014-05-20T23:58:20+5:30

अकोला : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वेळेवर मदत न देणार्‍या शासनाने शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देताच नाफेडची हरभरा खरेदी बंद केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात हरभरा खरेदी सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. डॉ. पाटील यांच्या इशार्‍यानंतर नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे.

Yashwanti Ranjit Patil's follow up to the purchase of Nafed gram | नाफेडच्या हरभरा खरेदीला मुदतवाढ रणजित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

नाफेडच्या हरभरा खरेदीला मुदतवाढ रणजित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वेळेवर मदत न देणार्‍या शासनाने शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देताच नाफेडची हरभरा खरेदी बंद केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात हरभरा खरेदी सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. डॉ. पाटील यांच्या इशार्‍यानंतर नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे.
आधीच गारपीट व अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता नाफेडने १० मेपासून हरभरा खरेदी बंद केली होती. हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर टाकण्याचा प्रताप नाफेडने केला होता. या प्रकारामुळे शेतकर्‍यांसमोर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांना अणखी एका संकटाचा सामना करावा लागत असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी दोन दिवसात हरभर्‍याची खरेदी सुरू न केल्यास शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा कृषीमंत्री शरद पवार यांना दिला होता. यासोबतच शासनाला पत्र पाठवून हरभरा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. आ. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे. नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या यंत्रणेने मुदतवाढ देण्याची कुठलीही माहिती शेतकर्‍यांना दिली नाही. वृत्तपत्रातून जाहिरात किंवा इतर कुठल्याही मार्गाने नाफेडने हरभर्‍याच्या खरेदीला मुदतवाढ मिळाल्याची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविली नाही. याबाबत डीएमओ यांच्याशी डॉ. रणजित पाटील यांनी संपर्क साधला असता यंत्रणेकडून निर्देश मिळाल्यानंतरही काही केंद्रांवर अद्यापही हरभरा खरेदी सुरू करण्यात आली नसल्याची त्यांना माहिती मिळाली. या कार्यालयातील कारभार पुरता ढेपाळला असून, शेतकर्‍यांविषयी कुठलाही कळवळा या कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना नसल्याचा आरोपही आ. डॉ. रणजित पाटील यांनी केला आहे.

** तुरीचे चुकारे तत्काळ द्या - आ. पाटील
शेतकर्‍यांचे तुरीचे चुकारे मागील तीन महिन्यांपासून देण्यात आलेले नसून, हे चुकारे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी डॉ. रणजित पाटील यांनी केली आहे. थकीत असलेले तुरीचे चुकारे खरीप पेरणीच्या आधी देऊन शेतकर्‍यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: Yashwanti Ranjit Patil's follow up to the purchase of Nafed gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.