यवतमाळचा दर्शन ठरला विभागात अव्वल, विभागीय शालेय कॅरम स्पर्धेचा थाटात प्रारंभ
By रवी दामोदर | Published: October 10, 2023 10:25 PM2023-10-10T22:25:30+5:302023-10-10T22:27:10+5:30
१४ वर्ष वयोगटाच्या स्पर्धा संपन्न; पहिल्याच दिवशी अटीतटीचे सामने
रवी दामोदर, अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन १० ऑक्टोबर रोजी बीजीई सोसायटीचे कार्यकारी सदस्य डॉ. अमित हेडा यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे. १४ वर्ष वयोगटात झालेल्या स्पर्धेत (मुले) यवतमाळचा दर्शन राठोड हा प्रथम, तर कार्तिक जाधव याने द्वितीय क्रमांक पटकाविला. तृतीय क्रमांकाचा मानकरी नैमेश पळसपगार याने पटकावला आहे. पहिल्याच दिवशी अटीतटीचे सामने झाल्याचे पहावयास मिळाले.
१४ वयोगटातील स्पर्धांसाठी अमरावती विभागातील ४२ मुले व ४२ मुली स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात ४० मुल व ३८ मुली स्पर्धकांनी हजेरी लावली होती. ईतर विजेत्यांमध्ये मुलांमध्ये अर्णव पाटील, प्रथमेश पाटील, श्रीप्रसाद सोनटक्के तसेच विजेत्या मुलीमध्ये श्वेता विजय चव्हाण, रीतिका जाधव, पायल पाचोडे यांचा समावेश आहे. विजयी झालेले खेळाडू हे राज्यस्तरावर सहभागी होणार आहेत.
बक्षीस वितरण सोहळा संपनन झाला असुन माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी बीजीई सोसायटीचे अध्यक्ष ऍड. मोतीसिंह मोहता, सचिव पवन माहेश्वरी, क्रीडा शिक्षक प्रा. अजय पालडीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. १७ वर्ष वयोगटातील मुले व मुलींचे सामने दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी होतील. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ऑल इंडिया कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रभजीत सिंह बछेर, करण चिमा, अकोला-बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर अससोसिएशनचे नरेंद्र नायसे आदी होते.
मुलींमध्ये अर्पिता करवते हिने पटविला प्रथम क्रमांक
मुली स्पर्धकांमध्ये अकोल्याची अर्पिता करवते अकोला मनपाही पहिली ठरली, तर सोनम गवई बुलडाणा ही द्वितीय आणि मयुरी ठॉमरे ही तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. अर्पिताने उत्कृष्ट प्रदर्शन केले. विजय मिळविल्याने तिने राज्यस्तरावर नाव पक्के केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अजिंक्य घेवडे, स्पर्धा समन्वयक तनिवर अहमद खान, मुख्य पंच तैकीरउल्ला खान, साहाय्यक पंच किरण पारडे, शेख मेहबूब, समिर जहांगीरदार, मंगेश धुरंधर. सूरज धुरंधर. सूरज गायकवाड, समीर अहमद, सलोणी जामनिक, नैना खंडारे, चिमा इंडस्ट्रीज चे प्रतिनिधी गवई परिश्रम घेत आहे.