यावर्षीही 'एलनिनो'चा प्रभाव; तज्ज्ञांच्या मते आताच भाकीत नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 06:34 PM2019-03-30T18:34:32+5:302019-03-30T18:34:36+5:30
अकोला : एल निनो चा प्रभाव हा मान्सूनवर होत असतो, हाच एल निनो यावर्षीही सक्रीय झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पंरतु मागच्यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवूनही मान्ूसन कमी झाला. त्यामुळे आताच एल निनोवर बोलू नये असे मत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले.
अकोला : एल निनो चा प्रभाव हा मान्सूनवर होत असतो, हाच एल निनो यावर्षीही सक्रीय झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पंरतु मागच्यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवूनही मान्ूसन कमी झाला. त्यामुळे आताच एल निनोवर बोलू नये असे मत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले.
अमेरिकेच्या पेरू भागातील समूद्राच्या पाण्यातील तापमान ५ अंशाच्यावर जाते तेव्हा एल निनो तयार होतो. पण त्यासाठी पाण्याच्या तापमानाचा अभ्यास करावा लागतो. आपल्याकडे हा अभ्यास केला जात नसल्याने जेथे एल निनो तयार होतो तेथील शास्त्रज्ञ हा अभ्यास करत असतात. त्यांच्या अभ्यासावरू न आपण एल निनो असल्याचे सांगत असतो. एन निनो मुळे समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्याने कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आपल्याकडील वारे तिकडे वाहतात, परिणामी आपल्याकडच्या मान्सूनवर त्याचा परिणाम होत असतो. मागच्यावर्षी आपल्याकडे मान्सून कमी झाल्यानंतर पुन्हा यावर्षीही एल निनो सक्रीय झाला असून, मान्सूनवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचा अंदाज अमेरिकन हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पंरतु मागच्यावर्षी समाधानकारक ९७ टक्के मान्सून बरसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तथापि हा अंदाज चुकला. त्यामुळे एल निनोवर आताच अंदाज बांधता येणार नाही असे कृषी हवामान तज्ज्ञांचे म्हणने आहे.
- यावर्षी एल निनोचा प्रभाव असून, मान्सूनवर त्याचा परिणाम होणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. तथापि मागच्यावर्षीच्या मान्सूनचा अंदाज चुकला. पंरतु आमच्या मॉडेलनुसार पावसाचा खंड पडणार हे सांगितले होते. म्हणून आताच एल निनोच्या अंदाजावर बोलता येणार नाही.
डॉ. रामचंद्र साबळे,
ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ, पुणे.