यंदा परदेशी पक्ष्यांनी फिरविली पातुरच्या निसर्गाकडे पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:52+5:302021-02-14T04:17:52+5:30
अकोला जिल्ह्यातील विविध प्रकारच्या पाणवठ्यांवर मात्र या पक्ष्यांच्या ‘गेट टुगेदरला’ दुर्दैवाने अजूनही सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. स्थलांतर ही ...
अकोला जिल्ह्यातील विविध प्रकारच्या पाणवठ्यांवर मात्र या पक्ष्यांच्या ‘गेट टुगेदरला’ दुर्दैवाने अजूनही सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही.
स्थलांतर ही पक्ष्यांची प्राचीन परंपरा आहे. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी लांब पल्ल्याचा प्रवास हा त्यांच्या जगण्यातील अविभाज्य भाग आहे. काही पक्षी प्रवासादरम्यान प्रजनन करतात. यातच पिल्ले मोठी होतात आणि उडायला लागल्यावर काही महिन्यांत मोठा प्रवास सुरू होतो. पक्ष्यांच्या स्थलांतराचे मुख्य कारण म्हणजे अन्नाचा तुटवडा. उत्तरेकडील प्रदेश बर्फाच्छादित झाला की, पक्ष्यांना अन्न मिळणे कठीण होते. छोट्या झुडपांसह मोठी झाडेदेखील बर्फाखाली झाकली जातात. या काळात अन्नासाठी पक्ष्यांना हजारो किलोमीटरचा प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. मुख्यत: ग्रीनलॅन्ड, नॉर्वे, कॅनडा, स्वीडन, उत्तर चीन, दक्षिण अमेरिका, अलास्का, मंगोलिया, मध्य आणि दक्षिण आफ्रिका या देशांतून अडीचशेहून अधिक प्रकारचे पक्षी भारतात मुक्कामाला येतात. यातील अनेक पक्ष्यांचा मुक्काम महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या पाणवठ्यावर किंवा माळरानावर असतो.
ऑक्टोबर हीट ओसरली की, विदर्भातील विविध प्रकारच्या जलाशयांवर नेहमीची बदके आणि करकोचांपेक्षा नवे चेहरे दिसायला सुरुवात होते. नोव्हेंबरमध्ये नवीन थवे दाखल होतात. फ्लेमिंगो पक्षी कधी इतरांच्या तुलनेत उशिरा; तर कधी बरोबरच दाखल होतात. काही पक्षी माळराने, गवताळ प्रदेशात उतरतात, तर पाणवठ्यांवरील पक्षी लहान-मोठ्या जलाशयांच्या किनाऱ्यांवर बस्तान बसवतात. हे पक्षी कोठून आले. त्यानुसार त्यांच्या परतीच्या वेळा बदलतात. साधारणत: मार्च किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांचा मुक्काम असतो. या सर्व बाबींचा आढावा निसर्गप्रेमी प्रा. भाष्कर काळे यांनी घेतला आहे.
फोटो: