वर्ष उलटले, पण दीड लाखांवर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 02:56 PM2018-06-29T14:56:49+5:302018-06-29T15:00:56+5:30
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ७९ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत केवळ १ लाख १६ हजार ४०२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
- संतोष येलकर
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ७९ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत केवळ १ लाख १६ हजार ४०२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेला वर्षभराचा कालावधी उलटून गेला असला तरी, जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ५९८ शेतकरी अद्यापही कर्जमाफी लाभाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी गत सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील एकूण २ लाख ७९ हजार थकबाकीदार शेतकऱ्यां पैकी १ लाख ३८ हजार ७३२ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केले होते. आॅनलाइन अर्ज केलेल्या आणि कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली. आॅनलाइन अर्ज केलेल्या १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत १ लाख १६ हजार ४०२ शेतकºयांना ४८९ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे. शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेला वर्षपूर्ती होत असली तरी, जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ५९८ शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत संपुष्टात!
कर्जमाफीसाठी गतवर्षी आॅनलाइन अर्ज सादर करू न शकलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनामार्फत आॅनलाइन अर्ज सादर करण्याची २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची ही मुदतही आता संपुष्टात आली आहे.
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात आॅनलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांपैकी २५ जूनपर्यंत १ लाख १६ हजार ४०२ शेतकºयांना ४८९ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).