यंदा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होणार ऑनलाईन पद्धतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:14 AM2021-06-17T04:14:19+5:302021-06-17T04:14:19+5:30

संयुक्त राष्ट्रसंघाने दि. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला आहे. गत पाच हजार वर्षांहून अधिक ...

This year, International Yoga Day will be celebrated online! | यंदा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होणार ऑनलाईन पद्धतीने!

यंदा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होणार ऑनलाईन पद्धतीने!

Next

संयुक्त राष्ट्रसंघाने दि. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला आहे. गत पाच हजार वर्षांहून अधिक परंपरा असणारी योग कला ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. गत वर्षापासून कोरोनाच्या संकटाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम समाज निर्माण व्हावा, ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, पतंजली योग समिती, योगासन सांस्कृतिक मंडळ, अजिंक्य फिटनेस पार्क, क्रीडा भारती, प्रजापिता ब्रह्माकुमारी, भारत स्वाभिमान संघ व विविध योग संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २१ जून रोजी सकाळी ७ ते ८ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने प्रात्यक्षिक आयोजित केले आहे.

------------------------------

कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योग दिन हा ऑनलाईन पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाईन लिंक जारी केली असून, या लिंकद्वारे कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून प्रात्यक्षिकाद्वारे योगाचे आयोजन केले आहे. या क्रार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.

Web Title: This year, International Yoga Day will be celebrated online!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.