यावर्षी ‘सेट’ नाहीच!

By admin | Published: November 14, 2014 11:13 PM2014-11-14T23:13:38+5:302014-11-14T23:13:38+5:30

युजीसीच्या जाचक रीअँक्रिडिटेशनचा फटका, पुढील वर्षी होणार परीक्षा.

This year is not set! | यावर्षी ‘सेट’ नाहीच!

यावर्षी ‘सेट’ नाहीच!

Next

अकोला : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार राज्यस्तरावर घेण्यात येणारी स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट (सेट) यावर्षी होणार नसल्याचे आता निश्‍चित झाले आहे. पुढील परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना फेब्रुवारी, मार्च २0१५ पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्यावतीने पदव्युत्तर पदवीत ५५ टक्के गुण म्हणजेच ह्यबी प्लसह्ण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांची सेट परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमधील विद्यार्थ्यांची वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेतली जाते; मात्र गत काही वर्षांंपासून त्यात खंड पडला आहे. वर्षातून दोन वेळा होणारी ही परीक्षा आता वर्षातून एकदाच घेतली जात आहे. त्यामुळे परीक्षेची मोठय़ा आतुरतेने वाट पाहणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
विद्यापीठाला प्रत्येक परीक्षा घेण्यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या रीअँक्रिडिटेशन समितीकडून परवानगी घ्यावी लागते. परवानगी घेण्याची ही प्रक्रिया किचकट आणि संथगतीने चालत असल्याने विद्यापीठाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेच विद्यापीठांनी वर्षातून एकदाच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने २0११ साली दोन परीक्षा घेतल्या होत्या. ७ ऑगस्ट आणि २७ नोव्हेंबर अशा दोन तारखांना या परीक्षा झाल्या. २0१२ साली एकही परीक्षा होऊ शकली नाही. गतवर्षी १७ फेब्रुवारी २0१३ रोजी पूणे विद्या पीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परवानगी घेऊन सेट घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. यावर्षी २0१४ मध्ये परीक्षा घेण्याचे प्रयत्न पूणे विद्यापीठाकडून सुरू होते. सुरुवातीला उन्हाळ्यात ही परीक्षा घेतली जाईल, असे संकेत मिळाले होते; परंतु लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. नंतर दिवाळीच्या आधी ही परीक्षा होईल, अशी अपेक्षा होती; मात्र विधानसभा निवडणुका लागल्यामुळे पुन्हा परीक्षा स्थगित झाली. निवडणुका आणि दिवाळीची धामधूम आटोपल्यानंतर डिसेंबरमध्ये परीक्षा होईल, अशी आशा होती; मात्र ही आशा आता मावळली आहे. सेट आता २0१५ साली फेब्रुवारी/ मार्चमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सेट देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांंना आता आणखी दोन-तीन महिने वाट पहावी लागणार आहे.

Web Title: This year is not set!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.