वर्ष उलटले; पण मिळाला नाही पीक विमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:43 PM2018-09-14T12:43:59+5:302018-09-14T12:44:18+5:30
जिल्ह्यातील शेतकºयांपैकी ८४ हजार शेतकºयांना विमा रकमेचा लाभ मिळाला असला, तरी ७ हजार ५०० शेतकºयांना अद्यापही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.
अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांपैकी ८४ हजार शेतकºयांना विमा रकमेचा लाभ मिळाला असला, तरी ७ हजार ५०० शेतकºयांना अद्यापही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. पीक विमा काढल्यानंतर वर्ष उलटून गेले; पण पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने, पीक विम्याची रक्कम खात्यात केव्हा जमा होणार, याबाबत विम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ४७ हजार शेतकºयांनी पीक विमा काढला होता. पीक विमा हप्त्याची रक्कम (प्रीमियम) संबंधित बँकेत जमा करून, जिल्ह्यातील शेतकºयांनी कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांचा विमा काढला. पीक विमा काढलेल्या शेतकºयांपैकी विम्याचा लाभ मंजूर झालेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया गत ६ जूनपासून नॅशनल इन्श्युरन्स कंपनीमार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार शेतकºयांच्या खात्यात विमा कंपनीमार्फत १०२ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली; परंतु पीक विम्याची रक्कम मंजूर झालेल्या ७ हजार ५०० शेतकºयांच्या खात्यात अद्याप पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली नाही. पीक विमा काढल्यानंतर वर्ष उलटून गेले; पण अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने, विम्याची रक्कम खात्यात जमा केव्हा होणार, याबाबत जिल्ह्यातील पीक विम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
७५०० शेतकºयांची यादी पाठविली विमा कंपनीकडे!
गतवर्षी पीक विमा काढलेल्या शेतकºयांपैकी पीक विमा मंजूर झालेल्या; मात्र अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली नसलेल्या जिल्ह्यातील ७ हजार ५०० शेतकºयांची यादी नॅशनल इन्श्युरन्स कंपनीच्या अकोल्यातील कार्यालयामार्फत विमा कंपनीच्या कोलकाता येथील मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयामार्फत मंजुरीनंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे.