होय.. माझ्या भूमिकेला बंडही समजू शकता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:45 AM2017-09-25T00:45:41+5:302017-09-25T00:47:20+5:30
अकोला : देशातील जनता, शेतकरी, बेरोजगांराना जी स्वप्न दाखविली होती, त्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. शे तकर्यांच्या आत्महत्या वाढत असताना शासनाकडून कुचेष्टा होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. या सर्वांनी ज्या जबाबदारीने मला लोकसभेत पाठविले आहे; परंतु त्यांच्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचे चित्र दिसत असल्याने मला मैदानात उतरावे लागले. त्याला तुम्ही बंड म्हणत असाल, तर म्हणू शकता, अशी परखड भूमिका चंद्र पूरचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी रविवारी येथे ‘लोकमत’शी बोलताना घेतली.
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क

शेतकरी जागर मंचाच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी खासदार पटोले अकोला येथे आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांची भूमिका परखडपणे मांडली. आम्ही जनतेमध्ये अनेक आश्वासने दिली होती. काळे धन आणणार; पण ते आले नाही. नोटाबंदीला जनतेने स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला; पण जे स्व प्न दाखविले, ते पूर्ण झालेच नाही. नंतर जीएसटी आल्यामुळे एकट्या महाराष्ट्रातील पाच हजार उद्योग बंद पडले. बेरोजगारी पराकोटीला गेली आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत; पण कर्जमाफीचा निर्णय घेताना शासनाच्या नवनवीन बोटचेपे धोरणामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. देशात २५0 जिल्हय़ांत दुष्काळी स्थिती असून, १५0 जिल्हे पाण्याखाली आहेत. विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्रात हेच चित्र आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यांचे प्रश्न घेऊन मी मैदानात उतरलो असून, पंतप्रधान, पक्षप्रमुख यांना काय वाटते ते वाटू द्या, मी मात्र माझा लढा सुरू च ठेवणार असून, लोकसभेत याचा जाबही अर्थमंत्र्यांना विचारणार असल्याचे ते म्हणाले. २५ सप्टेंबरपासून दिल्लीत पक्ष कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीला तुम्ही जाणार का, या प्रश्नादाखल त्यांनी आपण जाणार नसल्याचे सांगि तले. मतदारसंघात अनंत कामे असून, दुर्गा महोत्सवही आहे. त्यामुळे मला सध्या येथे राहणे महत्त्वाचे वाटते, असेही ते म्हणाले. तुमच्या या चळवळीत पक्षातील कोण कोण आहे, यावर त्यांनी बरेच जण सोबत असल्याचे अधोरेखित केले. मी बोलल्यानंतर अनेक जण आता बोलू लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी काळात राज्यात शेती, शेतमूजर, बेरोजगारांचे प्रश्न घेऊन लढणार आहोत. तद्व तच वैचारिक परिवर्तनासाठी आपण नव्याने प्रयत्न करणार असून, एकोपा कसा निर्माण करता येईल, यासाठीचे प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.