काल ‘ती’ होती मुकी, आज बोलू लागली...गुरुजींचे प्रयत्न फळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 06:12 AM2023-08-07T06:12:02+5:302023-08-07T06:12:10+5:30

- देवानंद गहिले लोकमत न्यूज नेटवर्क पातूर (जि. अकाेला) : जन्मापासून मूकबधिर, कधी कुणाशी बोलली नाही तर कुणाचा आवाजही ...

Yesterday 'she' was mute, today she started talking...Guruji's efforts paid off | काल ‘ती’ होती मुकी, आज बोलू लागली...गुरुजींचे प्रयत्न फळाला

काल ‘ती’ होती मुकी, आज बोलू लागली...गुरुजींचे प्रयत्न फळाला

googlenewsNext

- देवानंद गहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर (जि. अकाेला) : जन्मापासून मूकबधिर, कधी कुणाशी बोलली नाही तर कुणाचा आवाजही ऐकला नाही. मात्र, गुरुजींचे प्रयत्न, योग्य उपचार, साधन-साहित्याचा वापर या बळावर आता ‘ती’ बोलकी झाली. हा प्रकार नांदखेड (ता. पातूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला. यामुळे ग्रामस्थांसह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सुखद धक्का बसला आहे.

येथील कृष्णाली आनंदा लासुरकर ही जन्मत: मूकबधिर होती. गावात ती ‘मुकी’ म्हणून परिचित होती. आई-वडिलांनीसुद्धा तिला शाळेत पाठवायचे टाळले; परंतु शिक्षक अनिल नामदेव दाते व संदीप देऊळगावकर यांनी कृष्णालीच्या पालकांना आश्वासित करून मुलीचा शाळेत प्रवेश दिला. ला अकोल्यातील लेडी हार्डिंग रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठविले. तिला मूकबधिर असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे ती भविष्यात बोलू शकेल का नाही, याची शाश्वती कोणाला नव्हती. मात्र, शिक्षक दाते हरले नाहीत. 

मुकी म्हणू नये! 
दाते गुरुजींनी नांदखेडमध्ये जाऊन या मुलीला कुणी ‘मुकी’ म्हणू नये, अशी जागृती केली. ग्रामस्थांनाही आनंदाचा धक्का बसला आहे.

शिक्षकांची जिद्द
शिक्षक गणेश तायडे यांच्या माध्यमातून स्पीच ट्रेनर मशीन शाळेत आणली. ती मशीन मुलीला लावण्यात आली. मात्र, ती घाबरली. नंतर शाळेतून इतर मुलींना व टप्प्याटप्याने कृष्णालीला मशीन लावली. या सरावात तिला थोडे ऐकू येऊ लागले. काही दिवसांच्या प्रशिक्षणानंतर आता ती काही शब्द बोलू शकत आहे.   
 

Web Title: Yesterday 'she' was mute, today she started talking...Guruji's efforts paid off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.