दर महिन्याच्या २१ तारखेस होणार आता ‘योग दिवस’ साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2016 02:54 AM2016-06-11T02:54:26+5:302016-06-11T02:54:26+5:30

१२ ते २६ जानेवारी या कालावधीत ‘योग उत्सव’

The 'Yoga Day' will be celebrated on 21st of every month | दर महिन्याच्या २१ तारखेस होणार आता ‘योग दिवस’ साजरा

दर महिन्याच्या २१ तारखेस होणार आता ‘योग दिवस’ साजरा

googlenewsNext

नीलिमा शिंगणे/अकोला
उत्तम आरोग्यासाठी मनदेखील सुदृढ असणे आवश्यक आहे. मानसिक व आत्मिक विकास साधण्यासाठी 'योग' हा एकमेव पर्याय आहे. मनुष्याचा मानसिक आणि आत्मिक विकास झाला, तर निश्‍चितच सशक्त व सक्षम समाज निर्माण होतो. याकरिता राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये दर महिन्याच्या २१ तारखेला योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच राज्यामध्ये योगाचा प्रसार व जनजागृती करण्याच्या दृष्टीने दरवर्षी १२ ते २६ जानेवारी या कालावधीत पाच दिवसाच्या योग उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने मागीलवर्षी २१ जून हा जागतिक योगदिन म्हणून घोषित केला. यावर्षी दुसरा योग दिन साजरा होणार आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार यादिवशी देशभर सकाळी ७ ते ८ या वेळेत ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत योग उत्सव, चर्चासत्र, कार्यशाळा, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठामध्ये विद्यार्थ्याकडून सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, तसेच एन.एस.एस, नेहरू युवा केंद्र आदी संघटनांमार्फत योगासंबंधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन हे एका दिवसापुरते प्रतीकात्मक न राहता राज्यातील प्रत्येक गावामध्ये योगविद्येचा प्रसार व विकास कायमस्वरू पी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये दर महिन्याच्या २१ तारखेला योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यामध्ये योगाचा प्रसार व जनजागृती करण्याच्या दृष्टीने दरवर्षी १२ ते २६ जानेवारी या कालावधीत पाच दिवसांच्या योग उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्यातील योग दिन व उत्सव योग्यरीत्या साजरा होत आहे की नाही, याची देखरेख करण्याकरिता जिल्हा व राज्य स्तरावर समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
जिल्हा व राज्य स्तरावर होणार समितीचे गठन
संयुक्त राष्ट्रसंघाने '२१ जून' हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. पाच हजार वर्षांहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. दुसर्‍या जागतिक योग दिनाचे आयोजन २१ जून २0१६ रोजी होत आहे. मात्र, आयोजन एक दिवसापुरते र्मयादित न राहता राज्यातील प्रत्येक गावात योगाचा प्रसार होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला आता योग दिवस राज्यभरात साजरा होणार आहे.

Web Title: The 'Yoga Day' will be celebrated on 21st of every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.