सुदृढ आरोग्यासाठी योगा करा - पोलीस अधीक्षक
By Admin | Published: June 22, 2017 04:12 AM2017-06-22T04:12:28+5:302017-06-22T04:12:28+5:30
पोलीस मुख्यालयात ३00 अधिकारी-कर्मचा-यांचा योगा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या तब्बल ३00 च्यावर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी पोलीस मुख्यालयात योगा केला. यावेळी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पोलीस कर्मचार्यांना योगाचे महत्त्व पटवून देत सुदृढ आरोग्यासाठी योगा महत्त्वाचे असल्याचे मार्गदर्शन करताना सांगितले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचा योगा आयोजित करण्यात आला होता. यावेळी योगासन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे कैलास नागरे, वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील, ठाणेदार गजानन शेळके, शैलेश सपकाळ, अनिल जुमळे, गणेश अने, सुनील सोळंके यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.