जिल्हा परिषदेत हाेऊ शकताे खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:16 AM2021-04-19T04:16:53+5:302021-04-19T04:16:53+5:30
अकाेला जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या जागांच्या निवडणुकीबाबत माेर्चेबांधणी सुरू असतानाच आता जिल्हा परिषदेत खांदेपालट करण्याच्या विचार वंचित ...
अकाेला जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या जागांच्या निवडणुकीबाबत माेर्चेबांधणी सुरू असतानाच आता जिल्हा परिषदेत खांदेपालट करण्याच्या विचार वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
राजकीय आरक्षणाच्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयाने निकाल देत एकूण आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त नकाे, असे स्पष्ट केल्यानंतर जिल्हा परिषदेतील दानापूर, अडगाव बु., अकोलखेड, तळेगाव बु., कुटासा, लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदूरा, देगाव, दगडपारवा व शिर्ला या १४ जागावरील सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे जागांवर निवडणूक घेण्याबाबत शासनाची तयारी सुरू असून, इच्छुकांनीही माेर्च बांधणी सुरू केली आहे या पृष्ठभूमीवर वंचित बहुजन आघाडीने सर्कलनिहाय मेळावे पार घेतले. या मेळाव्यांमध्ये जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांबाबत पक्षाच्याच कार्यकत्यांकडूनअनेक तक्रारी आल्यामुळे जिल्हा परिषदेत खांदे पालट करण्याबाबत वंचितच्या वरिष्ठ पातळीवर विचारमंथन सुरू झाल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नसल्याने या तक्रांरींची गंभीर दखल घेतली जात असल्याची माहिती आहे
काेट.....
जिल्हा परिषद सदस्यांनीही काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे त्याबाबत चाैकशी सुरू आहे अंतिम निर्णय पक्षनेते बाळासाहेब आंबेडकर हेच घेतील
डाॅ धैर्यवर्धन पुुंडकर, उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
बाॅक्स....
संख्याबळाची अडचण कशी पार करणार
राजकीय आरक्षणामुळे रिक्त् झालेल्या जागांमध्ये वंचितला सर्वाधिक फटका बसला आहे त्यामुळे यापूर्वी जिल्हा परिषदेत असलेल्या २५ जागांचे बळ घटून ते आता १७ सदस्य एवढे झाले आहे त्यामुळे खांदेपालट करताना वंचित बहुजन आघाडीसमाेर संख्याबळाची अडचण उभी राहण्याची शक्यता आहेच. ही अडचण पार करून खांदेपालट हाेताे की पक्ष पातळीवरच ॲड. प्रकाश आंबेडकर हे समज देऊन सुधारण्याची संधी देतात याकडे लक्ष लागलेले आहे