आधार अपडेटसाठी दोन तास थांबावे लागते रांगेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:18 AM2021-02-07T04:18:08+5:302021-02-07T04:18:08+5:30
अकोला : आधार नोंदणी व अपडेट करण्यासाठी अकोला शहरात ४१ केंद्रे असून, आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांना दीड ते दोन ...
अकोला : आधार नोंदणी व अपडेट करण्यासाठी अकोला शहरात ४१ केंद्रे असून, आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांना दीड ते दोन तास रांगेत थांबावे लागते. त्यामुळे आधार अपडेटसाठी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
विविध महत्त्वाच्या कामांसाठी आधारकार्ड महत्त्वाचा पुरावा मानला जातो. केवळ आधारकार्ड असणे पुरेसे नसून, आधारकार्ड अद्ययावत (अपडेट) असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने आधार नोंदणी व आधार अपडेट करण्याच्या कामासाठी आधार केंद्रांवर नागरिकांची गर्दी होते. अकोला शहरात जिल्हा प्रशासन, बँका व डाक विभागाचे मिळून एकूण ४१ आधार केंद्रे आहेत. त्यामध्ये आधार अपडेटसाठी शहरातील आधार केंद्रांमध्ये नागिरकांच्या रांगा लागत असून, आधार अपडेट करण्यासाठी दीड ते दोन तास नागरिकांना रांगेत ताटकळत थांबावे लागते. नेट कनेक्टिव्हिटी अभावासह इतर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याच्या परिस्थितीत आधार अपडेट करण्यासाठी दोन तासापेक्षा अधिक विलंबाचा नागरिकांना सामना करावा लागतो. त्यामुळे आधार अपडेट करण्याच्या कामासाठी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
असे आहेत आधार केंद्र
जिल्हा प्रशासन : २२
बॅंका : १२
पोस्ट ऑफिस : ०७
यासाठी करावे लागते आधार अपडेट
विविध कामांसाठी आधार अपडेट करावे लागते. त्यामध्ये शिष्यवृत्ती, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, शालेय पोषण आहार योजना, आदी योजनांच्या लाभासह पीएफ, इपीएफ , बँकिंग सेवा, आदी विविध कामांसाठी आधार अपडेट करावे लागते.
आधार अपडेट करण्यासाठी दीड ते दोन तास रांगेत थांबावे लागते. तसेच नेट कनेक्टिव्हिटी नसल्यास व इतर तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास आणखी विलंबाचा मनस्ताप सहन करावा लागतो.
पराग गवइ
सामाजिक कार्यकर्ता, अकोला.