इट का जबाब पत्थरसे देंगे, राणेंवर नियमबाह्य गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:24 AM2021-08-25T04:24:06+5:302021-08-25T04:24:06+5:30
अकोला : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करताना त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे नियमबाह्य गुन्हे आहेत. खरे ...
अकोला : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करताना त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे नियमबाह्य गुन्हे आहेत. खरे तर असे गुन्हे दाखल व्हायलाच नकाे, शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे खुद्द उद्धव ठाकरे यांची दसरा मेळाव्यातील भाषणे तपासली तर त्यांची भाषा काेणत्या नियमात बसते? मुख्यमंत्र्यांनी राणेंवर गुन्हे दाखल करून राज्यातील कायदा व सुव्यवस्थाच वेठीस धरली आहे, जर शिवसैनिक भाजप कार्यालयावर येतील तर त्यांना इट का जबाब पत्थरसे देंगे हे लक्षात ठेवावे असा इशारा भाजपचे सरचिटणीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. ते अकाेल्यात दाैऱ्यावर आहेत या दरम्यान भाजपने केलेल्या आंदाेलनात त्यांनी सहभाग घेतला असता ते माध्यमांशी बाेलत हाेते. बावनकुळे म्हणाले की, या राज्यात मागच्या २ वर्षांपासून ५० उदाहरणे देता येईल की, शिवसेना आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून यापूर्वी शिवसेनेकडून भाजपच्या नेत्यांना अश्लील भाषेत वक्तव्य झाले आहेत. भाजपने कधीही यासंदर्भात जाळपोळ केली नाही गुन्हे दाखल केले नाहीत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, राज्यात जाणीवपूर्वक वातावरण खराब करणे किंवा बंगाल सारखे वातावरण करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींनी राज्याची काळजी घेणे आवश्यक हाेते. त्यांनी शिवसैनिकांना आवरायला हवे हाेते अशी अपेक्षाही बावनकुळे यांनी व्यक्त केली. या आंदाेलनात आमदार रणधीर सावरकर, महापाैर अर्चना मसने, भाजयुमाेचे प्रदेश प्रवक्ता विनाेद वाघ यांच्यासह मान्यवर सहभागी झाले हाेते.