अकोटात युवा शेतकऱ्याने केली काळ्या गव्हाची लागवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:20 AM2021-02-11T04:20:11+5:302021-02-11T04:20:11+5:30
काय आहे फायदा काळ्या गव्हावर मावा, तुडतुडे येत नाहीत. काळ्या गव्हाच्या जमिनीखाली असलेल्या बुंध्याला नैसर्गिक आपत्तीमुळे हानी होत नाही. ...
काय आहे फायदा
काळ्या गव्हावर मावा, तुडतुडे येत नाहीत.
काळ्या गव्हाच्या जमिनीखाली असलेल्या बुंध्याला नैसर्गिक आपत्तीमुळे हानी होत नाही.
काळ्या गव्हाच्या एका बुंध्याला ९ ते १० ओंब्या येतात, त्या सामान्य गव्हापेक्षा जास्त आहेत.
गहू हा काळा असून सामान्य गव्हाप्रमाणे तो हिरवा असतो.
आरोग्यविषयक लाभ
कृषितज्ज्ञांच्या मते, काळा गहू हा रक्तदाब, मधुमेह, रक्तपेशी, कॅन्सर, हृदयरोग आदी आजारांच्या उपचारासाठी गुणकारी आहे. त्यामुळे अशा दुर्धर आजारांच्या रुग्णांना काळ्या गव्हाचे सेवन आरोग्यदायी ठरू शकते.
पेरणीचा खर्चही कमी
काळ्या गव्हाच्या पेरणीचा खर्च हा सामान्य गव्हापेक्षा कमी आहे.
काळ्या गव्हासाठी एकरी ७ ते ८ हजार रुपये खर्च येतो.
त्यावर कुठलाही रासायनिक फवारा मारण्याची गरज नाही.
मित्राच्या सहाय्याने दोन एकर शेतात काळ्या गव्हाची लागवड केली आहे. २० ते २५ क्विंटल प्रति एकर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. सर्वसाधारण गव्हाच्या तुलनेत काळ्या गव्हाचे बियाणे महाग असले, तरी उर्वरित खर्च कमी आहे.
- सुहास तेल्हारकर, युवा शेतकरी, अकोलखेड, ता. अकोट